ग्वाल्हेरमध्ये भाजपकडून लढणार हा मराठी उमेदवार

ग्वाल्हेरमध्ये भाजपकडून लढणार हा मराठी उमेदवार

मध्य प्रदेशमध्ये भाजपने एका मराठी माणसाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. इंदूरमधून सुमित्रा महाजन यांना उमेदवारी मिळाली नसली तरी ग्वाल्हेरमध्ये मात्र मराठी उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. ग्वाल्हेरच्या या भाजपच्या मराठी उमेदवाराचं नाव आहे, विवेक नारायण शेजवलकर.

  • Share this:

ग्वाल्हेर, ६ एप्रिल : मध्य प्रदेशमध्ये भाजपने एका मराठी माणसाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. इंदूरमधून सुमित्रा महाजन यांना उमेदवारी मिळाली नसली तरी ग्वाल्हेरमध्ये मात्र मराठी उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. ग्वाल्हेरच्या या भाजपच्या मराठी उमेदवाराचं नाव आहे, विवेक नारायण शेजवलकर.

विवेक शेजवलकर हे ग्वाल्हेर महापालिकेचे विद्यमान महापौर आहेत. ग्वाल्हेरचे दुसऱ्यांदा महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांची इथल्या मराठी मतदारांवर चांगली पकड असल्याने त्यांना इथून उमेदवारी देण्यात आली आहे.

विवेक शेजवलकर यांचे वडील नारायण कृष्णराव शेजवलकर हे ग्वाल्हेरमधून दोनदा खासदार झाले आहेत. ते १९७७ आणि १९८० साली ग्वाल्हेरमधून खासदार म्हणून निवडून आले. ते जनसंघ आणि भाजपचे संस्थापक सदस्यही आहेत.

महापौर ते लोकसभेचे उमेदवार

विवेक शेजवलकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन आहे. तसंच भाजपच्या सगळ्या नेत्यांनी विवेक शेजवलकर यांच्या नावाला एकमताने पसंती दिली. शेजवलकर यांनी महापौरपदासोबतच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. ते ग्वाल्हेर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. आता ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये २९ एप्रिलला मतदानाला सुरुवात होते आहे. इथे लोकसभेच्या 29 जागा आहेत. ग्वाल्हेरमध्ये मागच्या निवडणुकीत नरेंद्रसिंग तोमर यांचा विजय झाला होता. नरेंद्रसिंग तोमर यांनी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषवलं होतं. आता विवेक शेजवलकर यांना मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागेल.

काँग्रेसने अजून ग्वाल्हेरच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. याआधी १९९९ मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवली होती. आता या लोकसभा निवडणुकीसाठी ज्योतिरादित्य शिंदे यांची पत्नी प्रियदर्शनी राजे शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

==========================================================================================================================================================

अक्षरमंत्र : असं काढा सुंदर अक्षर; अर्थात कॅलिग्राफीचे ऑनलाईन धडे (भाग १)

First published: April 6, 2019, 4:46 PM IST

ताज्या बातम्या