भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांबाबत गंभीर चूक, काँग्रेसचा खुलासा

भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांबाबत गंभीर चूक, काँग्रेसचा खुलासा

'संकल्प पत्र' असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं आहे. या जाहीरनाम्यात राम मंदिर मुद्द्यापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत आश्वासनं देण्यात आली. पण, या जाहीरनाम्यामध्ये एक मोठी चूक करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसने ट्वीटही केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अखेर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 'संकल्प पत्र' असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं आहे. या जाहीरनाम्यात राम मंदिर मुद्द्यापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत आश्वासनं देण्यात आली. पण, या जाहीरनाम्यामध्ये एक मोठी चूक करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसने ट्वीटही केलं आहे.

भाजपच्या या जाहीरनाम्यामध्ये महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे. मात्र, यावेळी लिहिताना 32 व्या पानावर 11 मुद्द्यात मोठी चूक करण्यात आली. 'महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले जातील' अशी ओळ या जाहीरनाम्यात लिहण्यात आली आहे. काँग्रेसने ही चूक शोधून काढत त्याबद्दल ट्वीट केलं आहे.

महिलांविषयी असं काही लिहणं ही गंभीर चूक आहे. हीच चूक अधोरेखित करत काँग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळे आता ही चूक भाजप कशी सुधारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोजगाराचा थेट उल्लेख केलेला नाही. पण शेतकरी, औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत संरचना यावर मात्र भर दिला आहे.

या मुद्द्यावर देत काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. भाजपने रोजगार आणि काळ्या पैशाचं नेमकं काय करणार, याचा कोणताही उल्लेख या जाहीरनाम्यात केलेला नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

मोठमोठ्या गप्पा करून लोकांना सापळ्यात अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. देशभरात 4 कोटी 70 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या या आकडेवारीकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधलं. या जाहीरनाम्यात कुठेही नोटबंदीचा उल्लेख नाही, अशी टीका त्यांनी केली.

उद्योगांवर भर

भाजपने रोजगार देण्याबदद्ल स्पष्ट वचन दिलेलं नाही. पण, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उद्योगांना 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद केली आहे. पायाभूत संरचनांसाठी 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पायाभूत संरचनांमध्ये एक लाख कोटी रुपयांची कर्जहमी योजनाही जाहीर केली आहे.

तरुणांसाठी स्टार्टअप आणि कौशल्य विकास कार्यक्रमांवर भाजपने भर दिला आहे. तरुणांसाठी खेलो इंडिया यासारख्या योजनांचीही घोषणा पक्षाने केली आहे. 2024 पर्यंत डॉक्टरांची संख्या दुप्पट केली जाईल, असंही भाजपने म्हटलं आहे.

काँग्रेसने काय दिलं वचन ?

भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगाराचा उल्लेख नसला तरी काँग्रेसने मात्र आपल्या जाहीरनाम्यात २२ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासोबतच 10 लाख लोकांना ग्रामपंचायतीत रोजगार देण्याचीही हमी दिली आहे. ग्रामीण भागातल्या रोजगारांच्या दृष्टीने मनरेगा योजनेचा लाभ घेण्याचं आश्वासन दिलं आहे. या जाहीरनाम्यातल्या योजना नेमक्या कशा पूर्ण होतील हा मात्र प्रश्नच आहे.

=====================

First published: April 8, 2019, 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading