भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आणि भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या महिला मोर्चाच्या एक नेत्या आणि भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचं प्रकरण पुढे आल्यानंतर भाजपने या दोघांवरही पक्षातून काढून टाकण्याची कारवाई केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 05:44 PM IST

भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आणि भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

तुलसी भारती

सिमला (हिमाचल प्रदेश), 24 जुलै : हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या महिला मोर्चाच्या एक नेत्या आणि भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या महिला नेत्यासोबत एक पुरुष आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला एक गाणंही सुरू आहे.

हे प्रकरण आहे, कुलू जिल्ह्यातलं. हा 12 मिनिटांचा व्हिडिओ न्यूज 18 कडे आहे. हा पूर्ण व्हिडिओ एका बाथरूममध्ये शूट केला आहे. हा अश्लील व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

पाहा VIDEO : राज्यसभेत हमसून हमसून रडू लागले खासदार

या व्हिडिओचं प्रकरण पुढे आल्यानंतर भाजपने या दोघांवरही पक्षातून काढून टाकण्याची कारवाई केली. भाजपचे आमदार सुरेंद्र शौरी यांनी या कारवाईबद्दलची माहिती दिली. पक्षामध्ये कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची अश्लीलता सहन केली जाणार नाही. त्यामुळेच या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे, असं ते म्हणाले.

Loading...

चोर पण प्रामाणिक असतो, एकदा हा VIDEO पाहाच!

या प्रकरणी न्यूज 18 ने कुलूच्या एसपींशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी, या प्रकरणात आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही, असं सांगितलं. या प्रकरणी तक्रार दाखल झाली तर आम्ही कारवाई करू, असंही ते म्हणाले.

=====================================================================================

VIDEO : भन्नाट देसी जुगाड, बाईकवर बसले तब्बल 11 जण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...