राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का; 6 पैकी 6 जागांवर पराभव

राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का; 6 पैकी 6 जागांवर पराभव

या पोटनिवडणुकांमध्येच इतकी दाणादाण उडाल्यामुळे आता पुढच्या वर्षीचं आव्हान कठीण जाणार आहे.

  • Share this:

07 एप्रिल: राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. 6 पैकी एकाही एकट्याने यश मिळवते आलेलं नाही .तर नाशकात भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

या पोटनिवडणुकांमध्येच इतकी दाणादाण उडाल्यामुळे आता पुढच्या वर्षीचं आव्हान कठीण जाणार आहे.

मुंबईतल्या सायन प्रतिक्षानगरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे विजयी झाले आहेत. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 17च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव विजयी झाल्या आहेत. पुण्याच्या मुंढवा मगरपट्टा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोंद्रे विजयी झाल्या आहेत. उस्मानाबादच्या अनाळा जिल्हा परिषदचे जागेवर शिवसेना-भाजपचे धनंजय सावंत विजयी झाले आहेत. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13च्या निवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले विजयी झाल्यात तर सोलापुरच्या प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसच्या तौफीक हत्तूरे विजयी झाल्या आहेत.

यामुळे आता पुढच्या वर्षी भाजप काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोटनिवडणूक विजय

सायन - प्रतिक्षानगर(मुंबई) रामदास कांबळे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 17(उल्हासनगर) सुमन सचदेव (राष्ट्रवादी काँग्रेस)

मुंढवा मगरपट्टा (पुणे) पूजा कोद्रे(राष्ट्रवादी काँग्रेस)

अनाळा जिल्हा परिषद(उस्मानाबाद) धनंजय सावंत (युतीचे उमेदवार)

प्रभाग क्रमांक 13(नाशिक) वैशाली भोसले(मनसे)

प्रभाग क्रमांक 14(सोलापूर) तौफीक हत्तूरे(काँग्रेस)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2018 07:28 PM IST

ताज्या बातम्या