भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा होणार पत्ता कट, हे आहे कारण!

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा होणार पत्ता कट, हे आहे कारण!

उमा भारती, सुषमा स्वराज या नेत्यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा या आधीच केली आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 8 मार्च  : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक शुक्रवारी राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या या संसदीय मंडळाच्या बैठकीत निवडणूक लढण्यासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना तिकीट द्यायचं नाही असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे मार्गदर्शक मंडळात असलेल्या अनेक नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते सध्या खासदार आहेत. अडवानी यांचं वय 91 वर्षांचं आहे. तर मुरली मनोहर जोशी हे 85 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय.

75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना मंत्रिपद देऊ नये असा भाजपचा निर्णय होता.

तर उमा भारती, सुषमा स्वराज या नेत्यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा या आधीच केली आहे.

आता हीच नियम उमेदवारी देतानाही लावण्यात येण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नेत्यांनी बाजूला होत नव्या लोकांना संधी द्यावी असं संघाच्याही नेत्यांच मत आहे. त्यामुळे या नेत्यांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते. त्याचबरोबर भाजपची प्रचार मोहिम कशी राहिल याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

लवकरच होणार तारखांची घोषणा

देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचार सभांची सुरूवातही झाली आहे. असं वातावरण असताना निवडणुकांच्या तारखांची घोषणा केव्हा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणं अपेक्षीत होतं. मात्र भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावामुळे त्यात थोडा उशीर होण्याची शक्यता शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून या तारखा घोषीत होण्याची शक्यता आहे.

VIDEO: क्लासमध्ये विद्यार्थीनीची काढली छेड; शिक्षकाला असा दिला चपला, बुटांचा आहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या