मराठी बातम्या /बातम्या /देश /नेपाळच्या बारगर्लसोबत BJP नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

नेपाळच्या बारगर्लसोबत BJP नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

हा आपत्तीजनक फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हा आपत्तीजनक फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हा आपत्तीजनक फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कानपूर, 9 जून : कानपूरमध्ये भाजपच्या (BJP) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. मंगळवारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे क्षेत्रीय अध्यक्ष विकास दुबे यांचा बारगर्लसोबतचा अश्लिल फोटो व्हायरल झाला आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विकास दुबे दोन वर्षांपूर्वी नेपाळ टूरवर गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल कथित फोटो समोर आला होता. विकास यांच्यासोबतच्या त्या कथित फोटोमध्ये असलेली तरुणी बार गर्ल असल्याचं सांगितलं जात आहे. भाजयुमोचे क्षेत्रीय अध्यक्ष आपत्तीजनक फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे.

विकास दुबे कानपूर-बुंदेलखंडचे क्षेत्रीय अध्यक्ष आहेत दोन वर्षांपूर्वी विकास दुबे क्षेत्रीय उपाध्यक्ष संदीप ठाकूर, एक इन्स्पेक्टर आणि अन्य एका साथीसोबत काठमांडूमध्ये फिरण्यासाठी गेले होते. यादरम्यान हा फोटो काढण्यात आला होता, असं सांगितलं जात आहे. क्षेत्रीय अध्यक्षाने हे विरोधकांचं कारस्थान असल्याचं सांगितलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, बदनामी करण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. कोणाच्याही वैयक्तित आयुष्यात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचं यावेळी ते म्हणाले.

भाजयुमोचे क्षेत्रीय अध्यक्ष विकास दुबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ जारी केला आहे. यात ते म्हणाले की, माझा फोटो एडिट करुन वापरण्यात आला आहे. काही पत्रकारांनी प्रभावित होऊन हा फोटो शेअर केला आहे. मी भाजपचा 20 वर्षे जुना कार्यकर्ता आहे. मी घाबरणार नाही आणि याला विरोध करीन. या फोटोचा फॉरेन्सिक तपास होईल. या प्रकरणात मानहानीचा दावादेखील करणार असल्याचं दुबे यांनी सांगितलं. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-राहुल गांधींना मोठा झटका, बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम

विकास दुबे यांची भाजपमध्ये मजबूत पकड आहे. विकास दुबे आणि संदीप ठाकूर हे चांगले मित्र आहेत. 2018 मध्ये विकास दुबे यांना बीजेवायएमचे प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले, तेव्हा विकासने संदीप ठाकूर यांना प्रदेश उपाध्यक्ष केले. यानंतर भाजपमध्ये दोन गट तयार झाले. एक गट विकास दुबे आणि संदीप ठाकूर यांचा होता, तर दुसरा गट दक्षिण जिल्हामंत्री नारायणसिंग भदौरिया यांचा होता. दोघांचे गट एकमेकांचे पोल उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असत.

First published:

Tags: BJP, Nepal