उद्या कर्नाटक हादरणार? भाजपने केला दावा; राजकीय घडामोडींना वेग

उद्या कर्नाटक हादरणार? भाजपने केला दावा; राजकीय घडामोडींना वेग

भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे तीन नाराज आमदार त्यांच्या सोबत आहेत. भाजप नेत्यांच्या मते सर्व काही व्यवस्थित झालं तर मकर संक्रांतीनंतर कर्नाटकात नवं सरकार बनेल.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : भाजप पुन्हा एकदा आॅपरेशन कमळ करायला सज्ज झालंय? भाजप कर्नाटकात सत्तापालट करणार? भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे तीन नाराज आमदार त्यांच्या सोबत आहेत. भाजप नेत्यांच्या मते सर्व काही व्यवस्थित झालं तर मकर संक्रांतीनंतर कर्नाटकात नवं सरकार बनेल.

दरम्यान, बातमी अशी आहे की काँग्रेसचे तीन आमदार मुंबईत पोचलेत. उरलेले चार संध्याकाळपर्यंत मुंबईत पोचतील. असं म्हणतायत की हे आमदार उड्डपी आणि बेळगाव इथले आहेत. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातल्या भाजपचे प्रभारी मंत्री व्ही. सतीशही आहेत.

कर्नाटकमधल्या एका भाजपच्या वरिष्ठ आमदारांनी सांगितलं, 'आमच्या हाय कमांडला वाटतं लोकसभेची निवडणूक काँग्रेस-जेडीएस यांनी एकत्र होऊन लढवली, तर भाजपसाठी कठीण जाईल. कर्नाटकात जास्तीत जास्त जागा जिंकणं गरजेचं आहे. हे जेव्हा शक्य होईल, तेव्हा तिथे आपलं सरकार असेल. एकदा का जेडीएस बाहेर पडला तर त्याला एकट्यानं निवडणूक लढवावी लागेल किंवा एनडीएमध्ये सामील व्हावं लागेल. त्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास संपेल. म्हणूनच आमचे नेते सत्तापालट करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहेत.'

काँग्रेसचे ट्रबल शूटर डी.के. शिवकुमार यांनी रविवारी ( 13 जानेवारी )ला म्हटलं होतं, राज्यातल्या सरकारला पाडण्यासाठी भाजप आॅपरेशन कमळ चालवतंय.त्यांनी असा आरोप केलाय की, काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतल्या एका हाॅटेलात भाजपच्या काही नेत्यांबरोबर राहिलेत.

शिवकुमारनं सांगितलं, 'राज्यात विधेयकांची खरेदी सुरू आहे. आमचे तीन आमदार भाजपच्या काही आमदारांबरोबर आणि नेत्यांबरोबर मुंबईच्या एका हाॅटेलमध्ये उतरलेत. तिथे काय झालंय, कुणाला किती रक्कम देऊ केलीय, हे आम्हाला माहीत आहे.'

First published: January 14, 2019, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading