भाजपाशी असलेले सर्व संबंध संपले - यशवंत सिन्हा

भाजपाशी असलेले सर्व संबंध संपले - यशवंत सिन्हा

माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ यशवंत सिन्हांनी भाजपला रामराम ठोकलाय. यापुढे पक्षाशी संबंध ठेवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

  • Share this:

दिल्ली, 21 एप्रिल : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ यशवंत सिन्हांनी भाजपला रामराम ठोकलाय. यापुढे पक्षाशी संबंध ठेवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रमंचातर्फे पाटणा इथे असलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, ' मी भाजप सोडतोय. देशात लोकशाही धोक्यात आलीये. अर्थसंकल्प अधिवेशन ठप्प होणं हे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे.'

त्यांनी विचारलंय, ' संसद चालावी म्हणून पंतप्रधान विरोधी पक्षांशी का बोलले नाहीत.? देशात रोकड कमी झाली याला जेटली आणि आरबीआई जबाबदार आहेत. भाजपाशी असलेले सर्व संबंध संपल्याचं त्यांनी सांगितलं.  सिन्हा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

मोदी सरकारला संसदेचं अधिवेशन चालू द्यायचं नव्हतं, असा स्पष्ट आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. 'संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र मोदी सरकारला याबद्दल कोणतीही चिंता नव्हती. उलट संसदेचं कामकाज चालत नसल्यानं सरकारला आनंदच झाला. कारण विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाणार होता. हा प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांचं समर्थन आवश्यक असतं. मात्र प्रस्तावाला किती जणांचं समर्थन आहे, हे मी मोजू शकत नाही, असं म्हणून लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना प्रस्ताव आणू दिला नाही. मोदी सरकारनं अशाप्रकारे लोकशाहीची थट्टा चालवली आहे,' अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 01:45 PM IST

ताज्या बातम्या