भाजपच्या नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या, हल्लेखोरांचा तपास सुरू

भाजपच्या नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या, हल्लेखोरांचा तपास सुरू

उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये देवबंद भागात भाजपच्या नेत्याची हत्या करण्यात आली. या नेत्याला दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

  • Share this:

लखनौ, 8 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये देवबंद भागात भाजपच्या नेत्याची हत्या करण्यात आली. या नेत्याला दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यशपाल सिंह असं या असं या भाजपच्या नेत्याचं नाव आहे.यशपाल सिंह देवबंदहून मिरगपूरला चालले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांना गोळी घातली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू ओढवला. घटना घडल्याच्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

(हेही वाचा : मंदीचा सगळ्यात जास्त फटका या कार कंपनीला,गेल्या 9 महिन्यांत विकली गेली एकच कार)

हल्लेखोरांचा शोध सुरू

यशपाल सिंह यांना गोळ्या घालणाऱ्या हल्लेखोरांना अजून पकडण्यात आलेलं नाही. यशपाल सिंह हे मिरगपूरचे सरपंच शिवकुमार यांचे मोठे भाऊ आहेत. ते मंगळवारी मानकी रोडहून जात होते. त्याचवेळी त्यांची हत्या करण्यात आली. यशपाल सिंह यांची हत्या नेमकी कशातून झाली, त्यामागे नेमकं काय राजकारण आहे ते कळू शकलेलं नाही.पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

(हेही वाचा : पाकिस्तानच्या सीमेवरून पंजाबमध्ये घुसला ड्रोन, सीमेवर हाय अलर्ट)

==================================================================================

VIDEO : मोदींमुळेच कलम 370 हटवणे शक्य झालं, अमित शहांचा दावा

First published: October 8, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading