अमेठीत भाजप नेत्याच्या मुलाची गोळी झाडून हत्या, परिसरात तणाव

अमेठीत भाजप नेत्याच्या मुलाची गोळी झाडून हत्या, परिसरात तणाव

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना नातेवाईंच्या रोषाचा सामना करावा लागला.

  • Share this:

अमेठी, 14 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील अमेठीतील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळत चालल्याचं दिसत आहे. अमेठीतील गौरीगंज इथल्या पोलीस स्थानकापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर तरूणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना नातेवाईंच्या रोषाचा सामना करावा लागला.

गौरीगंजमधील मुसाफिरखाना मार्गावरील बिशुनदासपूर इथं भररस्त्यावर तरूणाची हत्या करण्यात आली. या परिसरात राहणाऱ्या अप्रित आणि चंद्रशेखर या दोन युवकांची जुन्या वादातून हाणामारी सुरू झाली. हे भांडण सोडवण्यासाठी जवळच असलेला भाजप नेते शिवनायक सिंग यांचा मुलगा सोनू सिंग हा तिथं आला.

मात्र मध्यस्थी करणाऱ्या सोनू सिंग याच्यावरच हाणामारी करणाऱ्या चंद्रशेखर या युवकाने गोळीबार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सोनू सिंगला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोनू सिंग याला गोळी मारल्यानंतर आरोपी चंद्रशेखर हा तिथून फरार झाला.

या घटनेनंतर लोकांचा पोलीस प्रशासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळाला. पोलीस स्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झालेल्या भाजप नेत्याच्या मुलाच्या हत्येनं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तसंच लवकरात लवकर या आरोपीला पकडून त्याला शिक्षा करावी, अशी मागणी संतप्त नातेवाईंनी केली आहे.

दोन हॉटेल मालकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 14, 2019, 12:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading