काँग्रेसच्या नेत्याने केली भारताची पाकिस्तानात बदनामी, भाजपने केला हल्लाबोल

काँग्रेसच्या नेत्याने केली भारताची पाकिस्तानात बदनामी, भाजपने केला हल्लाबोल

'शशी थरूर यांनी लाहोर थिंक फेस्टिव्हलमध्ये जे वक्तव्य दिलं ते भारताची टिंगल-टवाळी करणारं होतं. कोरोनाची स्थिती ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी हाताळली त्यावरून सर्व जग त्याचं कौतुक करत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर:  काँग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाज निर्माण झाला आहे. पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बोलताना त्यांनी मोदी सरकारबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. देश आणि सरकार कोरोनाविरुद्ध लढत असताना शशी थरून यांनी पाकिस्तानात भारताची बदनामी केली असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी (Sambit Patra ) केला आहे.

पात्रा म्हणाले, शशी थरूर यांनी लाहोर थिंक फेस्टिव्हलमध्ये जे वक्तव्य दिलं ते भारताची टिंगल-टवाळी करणारं होतं. भारतात कोरोनाविरुद्ध लढताना नरेंद्र मोदी सरकारला अनेक आघाड्यांवर अपयश आल्याचं थरूर यांनी म्हटलं होतं.

पात्र म्हणाले, कोरोनाची स्थिती ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी हाताळली त्यावरून सर्व जग त्याचं कौतुक करत आहे. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेणं, 80 कोटी गरीब लोकांना धान्याचा पुरवढा करणं आणि जगभरातल्या 150 पेक्षा जास्त देशांना हाइड्रोक्सिक्लोरोक्वीनचा पुरवढा करणं असे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. असं असतानाही थरूर हे भारताची बदनामी करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

भारत 20 जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार, चीनला देणार मोठा झटका; अशी आहे योजना!

पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांचे मित्र असलेल्या थरूर यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून काँग्रेस पक्षाची मानसिकता स्पष्ट होते असंही ते म्हणाले.

सगळ्याच देशांमध्ये असहिष्णुता वाढिला लागली आहे. कुठल्याही समाजासाठी ही चांगली गोष्ट नाही.  विविध मतं आणि मतांतरं असलेल्या लोकांनी एकजिनसीपणे राहणं यातच सगळ्यांचं कल्याण आहे असं मतही शशी थरूर यांनी व्यक्त केलं होतं. थरूर यांच्या या वक्तव्यावरून भाजपने हल्लाबोल केल्याने राजकारण तापलं आहे.

भारताच्या सीमेजवळ चीनने डागली क्षेपणास्त्र, उद्दामपणे VIDEO केला व्हायरल

थरूर यांनी याआधीही केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले आहेत. भाजप आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप थरूर यांनी केला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 18, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading