Elec-widget

भाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य

भाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य

तामिळनाडूचे भाजपचे नेते एसवी शेखर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीये.

  • Share this:

तामिळनाडू, 20 एप्रिल : तीनच दिवसांपूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकाराचा गाल थोपटल्याप्रकरणी चोहीबाजूने टीका झाली होती. आता तर एक भाजपच्या नेत्याने महिला पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापजनक वक्तव्य केलंय.

तामिळनाडूचे भाजपचे नेते एसवी शेखर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये एसवी शेखर याने महिला पत्रकारांविरोधात असंसदीय आणि अत्यंत हीन भाषेत पोस्ट लिहिलीये. "मोठ्या व्यक्तींसोबत सेक्स केल्याशिवाय कोणतीही महिला पत्रकार अँकर होऊ शकत नाही अशा शब्दात एसवी शेखर यांनी संतापजनक आणि चीड आणणारं वक्तव्य केलंय.

इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस' आणि 'रिपब्लिक' वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार,  एसवी शेखरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी ज्या महिला पत्रकाराचा गाल थोपटला होता, त्या महिला पत्रकाराने केलेला आरोप चुकीचा आहे. भाजपला बदनाम करण्यासाठी तिने हा आरोप केलाय अशा चोराच्या उलट्या बोंबा एसवी शेखर यांनी मारल्या.

एसवी शेखर याने तमिळ सिनेमात काम केलंय. त्यांनी ही पोस्ट तमिळमधून लिहिलीये.

एसवी शेखर एवढ्यावर थांबले नाही, "मीडियामध्ये आज अनेक अज्ञानी आणि निरुपयोगी लोकं आहे. राज्यपालांवर आरोप करणारी महिला याला अपवाद नाही. शिक्षण क्षेत्रापेक्षा मीडिया क्षेत्रात महिलांसोबत जास्त प्रमाणात लैंगिक शोषण होतं. महिला पत्रकार मीडियामध्ये पद मिळवण्यासाठी वरिष्ठांसोबत सेक्स करतात" अशी अक्कलही शेखर यांनी पाजळली.

Loading...

यामध्ये अनेक महिला पत्रकार अपवाद आहे त्यांचा मी आदर करतो, पण तामिळनाडूमध्ये मीडियामध्ये जास्त प्रमाणात ब्लॅकमेल करणारे घाणरेडे पत्रकार आहे असंही शेखर म्हणाले.

शेखर यांच्या पोस्टमुळे वाद झाल्यानंतर त्यांनीही फेसबुकवरील पोस्ट काढून टाकली आणि माफीही मागितली.

मी न पाहता ही पोस्ट टाकली होती. जर महिलांची मन दुखावली असले तर मी त्यांची माफी मागतो असा माफीनामा शेखर यांनी सादर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...