मराठी बातम्या /बातम्या /देश /

आई, पत्नी आणि मुलीच्या डोळ्यादेखत BJP नेत्याची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी हवेत फिरवल्या तलवारी

आई, पत्नी आणि मुलीच्या डोळ्यादेखत BJP नेत्याची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी हवेत फिरवल्या तलवारी

(File Photo)

(File Photo)

केरळ राज्यातील अलप्पुझा जिल्ह्यात रविवारी भाजप नेते (BJP leader) रंजित श्रीनिवास यांची घरात घुसून हत्या (Ranjith Sreenivas Murder) करण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अलप्पुझा, 21 डिसेंबर: केरळ राज्यातील अलप्पुझा जिल्ह्यात रविवारी भाजप नेते (BJP leader) रंजित श्रीनिवास यांची घरात घुसून हत्या (Ranjith Sreenivas Murder) करण्यात आली आहे. ते भाजपच्या मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाचे राज्य सचिव होते. याशिवाय ते भाजप प्रदेश समितीचे सदस्यही होते. मारेकऱ्यांनी श्रीनिवास यांची त्यांच्या पत्नी, आई आणि मुलीच्या डोळ्यादेखत हत्या केली आहे. बदलेच्या भावनेतून श्रीनिवास यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

खरंतर, या घटनेच्या एक दिवस आधी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे नेते एस शान यांच्यावर शनिवारी रात्री घरी परतत असताना प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर रविवारी भाजप नेते रंजित श्रीनिवास यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांची हत्या केली आहे. श्रीनिवास यांची हत्या नेमकी कशी आणि केव्हा झाली, याबाबत अधिक माहिती देताना श्रीनिवास यांचे भाऊ अभिजित यांनी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे.

हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

यावेळी त्यांनी सांगितलं की, “घटनेच्या दिवशी रंजित श्रीनिवास यांना कोची येथील भाजपच्या ओबीसी मोर्चा समितीच्या पहिल्या बैठकीला जायचं होतं. हा दिवस आमच्या कुटुंबासाठी एक शुभ दिवस होता. तो मंदिरात जाऊन पूजा करून घरी परतला होता. त्यांचा कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग नव्हता. पण जेव्हा एसडीपीआयच्या राज्यस्तरीय नेत्याची हत्या झाली, तेव्हा सूडाने पेटलेली एक टोळी त्याच उंचीच्या भाजप नेत्याच्या शोधात होती.'

हेही वाचा-मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

अभिजित यांनी पुढे सांगितलं की, 'अज्ञात मारेकऱ्यांनी भावाच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यावेळी त्यांनी घरातील सामानाची देखील तोडफोड केली. आई, पत्नी आणि लहान मुलीच्या डोळ्यातदेखत आरोपींनी श्रीनिवास यांच्या डोक्यावर घाव घातले. श्रीनिवास यांची धाकटी मुलगी जेव्हा ड्रॉईंग रूममध्ये धावत आली, तेव्हा हल्लेखोरांनी हवेत तलवार फिरवली. लेकाला मारहाण होताना आई भांडणात पडली असता, मारेकऱ्यांनी तिचा चेहरा देखील खुर्चीने दाबला.'

First published:

Tags: Crime news, Kerala, Murder