मराठी बातम्या /बातम्या /देश /

सोशल मीडियावरही नितीन गडकरींचा बोलबाला; YouTube कडून दर महिन्याला मिळतं इतकं मानधन

सोशल मीडियावरही नितीन गडकरींचा बोलबाला; YouTube कडून दर महिन्याला मिळतं इतकं मानधन

आपल्या बिनधास्त भाषणांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यूट्यूबकडून मोठी रक्कम मिळते.

आपल्या बिनधास्त भाषणांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यूट्यूबकडून मोठी रक्कम मिळते.

आपल्या बिनधास्त भाषणांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यूट्यूबकडून मोठी रक्कम मिळते.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : आपल्या बिनधास्त भाषणांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल एक (Nitin Gadkari Speech) माहिती समोर आली आहे. म्हणजे त्यांनीच याबाबत आपल्या एका भाषणात सांगितलं. नितीन गडकरींनी अनेकदा भाषणादरम्यान अगदी सर्वांसमोर अधिकाऱ्यांचीही बिन पाण्याने धुलाई केली आहे.

त्यांची ही बिनधास्त भाषणं खूप पाहिली जातात. आणि याबाबत नितीन गडकरी यांनी स्वत: माहिती दिली. गडकरी म्हणाले की, त्यांना प्रत्येक महिन्याला यूट्यूबकडून 4 लाख रुपये दिले जातात. त्यांनी शुक्रवारी सांगितलं की, युट्यूबवर त्यांचे (Nitin Gadkari Speech on YouTube) व्हिडीओ खूप पाहिले जातात. यामुळे त्यांना महिन्याला 4 लाख रुपयांची रॉयल्टी (Royalty of Rs 4 lakh per month) मिळते. ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात त्यांची भाषण खूप जणांनी पाहिली. त्यामुळे वाचकवर्ग वाढला आहे आणि यूट्यूबकडून येणारे पैसेदेखील वाढले आहेत. गुजरातमधील (Gujrat News) भरूचमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या कामाची समीक्षा करीत असताना गडकरी याबाबत म्हणाले.

हे ही वाचा-बायकोला न सांगता सासरच्या घरावर चालवला बुलडोझर; गडकरींनी सांगितला तो प्रसंग

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, त्यांच्या मंत्रालयात आता रस्ते बांधकाम अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नितीन गडकरी यांनी कोरोना संसर्गादरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये आपला वेळ कसा घालवला याबद्दल देखील शेअर केलं. गडकरी म्हणाले की, या दरम्यान मी शेफ झालो होतो. त्यामुळे घरात स्वयंपाक करीत होतो. याशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लेक्चर देत होतो. यावेळी गडकरी म्हणाले की, यादरम्यान मी तब्बल 950 लेक्चर्स दिले. यातील अनेक लेक्चर्स परदेशातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर दिले आहेत. (BJP leader Nitin Gadkari gets Rs 4 lakh per month from YouTube for his speech)

" isDesktop="true" id="605890" >

गडकरी पुढे म्हणाले की, हे व्हिडीओ आम्ही यूट्यूबवर अपलोड केले होते. या व्हिडीओचा वाचकवर्ग जलद गतीने वाढत आहे. याशिवाय युट्यूबने तर मला दर महिन्याला 4 लाखांची रॉयल्टी देणं सुरू केलं आहे. हरियाणामधील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या समीक्षेदरम्यान ते म्हणाले होते की, हायवेचं बांधकाम सुरू असताना त्यांना सासरच्या घरावर बुलढोजर चालवण्यास सांगितलं होतं.

First published:

Tags: BJP, Nitin gadkari, Youtube, YouTube Channel