MP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

MP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

मनोज ठाकरे यांच्यावर अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

भोपाळ, 20 जानेवारी : मनोज ठाकरे या भाजपच्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील बडवानी येथील भाजपचे विभाग अध्यक्ष मनोज ठाकरे यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

मनोज ठाकरे यांच्यावर अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह शेजारी असलेल्या शेतात फेकून दिला.

सकाळच्या सुमारास शेतात मनोज ठाकरे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्याची हत्या होण्याची या आठवड्यातील मध्य प्रदेशातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि मंदसौर नगरपालिकेचे अध्यक्ष प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर आता कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून टीका होत आहे.

Special Report : दादांची तलवार म्यान!

First published: January 20, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading