मराठी बातम्या /बातम्या /देश /

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात 'ऑपरेशन लोटस', 38 आमदार भाजपच्या संपर्कात!

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात 'ऑपरेशन लोटस', 38 आमदार भाजपच्या संपर्कात!

महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार कोसळून एक महिना होत नाही तोच आता आणखी एका राज्यातलं बिगर-भाजप (BJP) सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार कोसळून एक महिना होत नाही तोच आता आणखी एका राज्यातलं बिगर-भाजप (BJP) सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार कोसळून एक महिना होत नाही तोच आता आणखी एका राज्यातलं बिगर-भाजप (BJP) सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    मुंबई, 27 जुलै : महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार कोसळून एक महिना होत नाही तोच आता आणखी एका राज्यातलं बिगर-भाजप (BJP) सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारबाबत भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakravarthy) यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज ऐकायची आहे? सध्या टीएमसीच्या 38 आमदारांसोबत आमचे चांगले संबंध आहेत, यातले 21 जण आमच्या थेट संपर्कात आहेत, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. 2021 साली झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा लागोपाठ तिसऱ्यांदा विजय झाला. या निवडणुकीमध्ये भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या, पण 5 महिन्यांमध्ये हीच संख्या 7 ने कमी होऊन 70 एवढी झाली. यातल्या बऱ्याच आमदारांनी भाजपची साथ सोडत टीएमसीमध्ये प्रवेश केला. कोलकात्याममध्ये भाजप आमदारांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मिथुन चक्रवर्ती बोलत होते. बंगालमध्ये 2021 साली झालेल्या विधानसभा निवडणुका जबरदस्ती करून जिंकण्यात आल्या. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपचा विजय निश्चित आहे, असा दावाही मिथुन यांनी केला. शाहरुख, सलमान आणि आमिरचं नाव भाजपला मुस्लिमविरोधी सांगणं हा एक कट आहे. देशाचे तिन्ही मोठे सुपरस्टार सलमान, शाहरुख आणि आमिर खान मुस्लिम आहेत. 18 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. जर भाजप मुस्लिम स्टार्सचा द्वेष करत असतं तर हिंदूंनी त्यांच्यावर प्रेम केलं नसतं, मग या राज्यांमध्ये या तिन्ही स्टार्सचे चित्रपट एवढी कमाई कसे करतात? असा सवाल मिथुन चक्रवर्ती यांनी उपस्थित केला. हिंदू, मुस्लिम, शिख सगळे माझ्यावर प्रेम करतात, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे, असंही मिथुन म्हणाले. 2024 मध्ये भाजप सरकार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार बनवू शकणार नाही, असं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममतांचा हा दावा मिथुननी फेटाळून लावला. देशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार बनेल, तसंच 18 राज्यांमध्येही भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास मिथुन यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी सरकारमधले काही मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. चुकीचं काम केलं असेल तर कोणतीही शक्ती त्यांना वाचवू शकत नाही, पण पुरावा नसेल तर घाबरण्याची गरज नाही, असं वक्तव्य मिथुन चक्रवर्ती यांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Mamata banerjee, West bengal

    पुढील बातम्या