नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचे दीर्घ आजारानं निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) भावुक झाले आहेत. त्यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहताना राम मंदिर आदोलनातील त्यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे. अयोध्या प्रश्न सोडवण्याठी त्यांची कटिबद्धता, समर्पण आणि गांभीर्य हे भव्य राम मंदिर उभरण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांतचं प्रेरणास्थान होते, असं अडवाणींनी सांगितलं.
भाजपाचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या अडवाणींनी सांगितले की, 'राम जम्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान कल्याण सिंह यांच्या अनेक आठवणी आहेत. ते भारतीय राजकारणातील दिग्गजनेता होते. त्यांनी नेहमीच मागास वर्गाच्या उत्कर्षासाठी काम केले. त्यांच्या निस्वार्थ व्यक्तीमत्वानं येणाऱ्या अनेक पिढीला प्रेरणा मिळेल.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये जावून कल्याण सिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मोदी म्हणाले की, 'कल्याण सिंह यांनी आयुष्यात अशी काम केली की त्यामुळे त्यांचे नाव सार्थ ठरले. ते संपूर्ण देशासाठी एक विश्वासू व्यक्ती बनले होते. आयुष्याचा बहुतेक कालावधी त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी खर्च केला. त्यांच्या निधनामुळे देशानं एक मुल्यांची जपणून करणारा ज्येष्ठ नेता गमावला आहे.
भारतात दाखल होताच अफगाण नागरिक अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले...
कल्याण सिंह यांना 21 जूनला ब्लड शूगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर शनिवार (21 ऑगस्ट) पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. 17 जुलैला अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हापासून ते सतत ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेश सरकारनं 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, BJP