भाजप नेत्यानं 20 वर्षांनी सेवन केलं अन्न, 'या' कारणासाठी केला होता संकल्प

भाजप नेत्यानं 20 वर्षांनी सेवन केलं अन्न, 'या' कारणासाठी केला होता संकल्प

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash vijayvargiya) यांनी 20 वर्षांपूर्वी संकल्प केला होता, त्यावेळी अन्नत्याग केला. त्यांचा हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर 20 वर्षांनंतर त्यांनी अन्नग्रहण केलं आहे.

  • Share this:

इंदोर, 2 मार्च : तुम्ही किती दिवस काहीही न खाता राहू शकाल, काही दिवस, काही आठवडे, फार फार तर महिनाभर. मात्र मध्य प्रदेशच्या इंदोरमधील (Indore) भाजप नेत्याने एक, दोन महिने नव्हे तर तब्बल 20 वर्ष काहीही खाल्लं नाही आणि तेही आपल्या जन्मभूमीच्या विकासासाठी. 20 वर्षांनंतर संकल्प पूर्ण झाला आणि त्यांनी अन्नग्रहण केलं.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय (Kailash vijayvargiya) यांनी 20 वर्षांनंतर अन्न खाल्लं आहे. 20 वर्षांपूर्वी इंदोरच्या विकासासाठी त्यांनी संकल्प केला होता. यावेळी अन्नाचा पूर्णपणे त्याग केला होता. आता त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अन्नग्रहण केलं.

2000 साली कैलाश विजयवर्गीय इंदोरचे महापौर म्हणून निवडून आले. त्यावेळी इंदोरवर पितृ दोष आहे त्यामुळे इंदोरचा विकास होत नाही, असं त्यांना कुणीतरी सांगितलं.

हे वाचा - मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शहरावरील हा पितृ दोष दूर करण्यासाठी पितृ पर्वतावर हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करावी लागेल, असा मार्गही त्यांना देण्यात आला. त्याचवेळी कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांची जन्मभूमी असलेल्या इंदोरच्या विकासासाठी संकल्प केला. जोपर्यंत पितृ पर्वतावर जगातील सर्वात उंच अष्टधातूंची हनुमानाची मूर्ती स्थापन होणार नाही, तोपर्यंत अन्नाचा एक दाणाही घेणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली.

20 वर्षांनंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला आहे. इंदोरच्या पितृ पर्वतावर सर्वात उंच अशी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तब्बल 72 फूट उंच आणि 108 टन वजनाची अशी ही अष्टधातूंची हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीची प्राणपतिष्ठा करण्यात आली. मूर्तीसाठी जवळपास 15 कोटी रुपये खर्च झालेत.

हे वाचा - नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीसाठी खुशखबर

First published: March 2, 2020, 5:57 PM IST

ताज्या बातम्या