Home /News /national /

15 लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणी भाजप नेत्याला 2 वर्षांची कैद व 2.97 कोटींचा दंड

15 लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणी भाजप नेत्याला 2 वर्षांची कैद व 2.97 कोटींचा दंड

भाजप नेत्याला या प्रकरणात मोठी शिक्षा सुनावली आहे

    गांधीनगर, 3 ऑक्टोबर : गुजरातमधील गांधीनगर येथील एका कोर्टाने शनिवारी भाजपचे माजी लोकसभा सदस्य यांना चेक बाऊन्स प्रकरणी दोन वर्षांची कैद आणि 2.97 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न चुकविल्यास अतिरिक्त तीन महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षाही त्यांना सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण 14 लाख 85 हजार रुपयांच्या चेक बाऊंसमुळे निर्माण झाले आहे. कलोलमध्ये प्रधान वरिष्ठ दीवानी न्यायाधीश डी.एस.ठाकूर यांनी हा आदेशही दिला की सुरेंद्रनगरचे माजी खासदार देवजी फतेपुरा यांनी दंडाची 2 कोटी 97 लाखांची रक्कम तक्रारकर्ता प्रभातसिंह ठाकूर यांना दिली नाही तर त्यांना 3 महिन्याच्या अतिरिक्त कैदेची शिक्षा दिली जाईल. ठाकूरचे वकील भानु पटेल यांनीही माहिती दिली आहे. हे ही वाचा-निर्भयानंतर हाथरसमधील तरुणीला देणार न्याय; सीमा कुशवाह यांचा सुप्रीम कोर्टात लढा या प्रकरणात पटेल यांनी सांगितले की, फतेपुरा यांचा 14,85,000 रुपयांचा चेक बाऊंस झाला होता आणि माजी खासदार यांनी या प्रकरणात पाठविलेल्या नोटीशीचं उत्तरही दिलं नव्हतं. यानंतर संतप्त झालेल्या ठाकूर यांनी पैसे मिळविण्यासाठी  कोर्टाचे दार ठोठावले. या प्रकरणात पटेल म्हणाले की, फतेपुरा यांनी 2018 मध्ये एका जमिनीच्या व्यवहारसंदर्भात ठाकूर यांच्याकडून ही रक्कम घेतली होती. आणि ती परत करण्यासाठी चेक दिला होता. हा व्यवहार होऊ शकला नाही. मात्र फतेपुरा यांनी ती रक्कम परत केली नाही. त्याशिवाय त्यांनी नोटीशीचं उत्तरही न दिल्याने अखेर त्यांच्याविरोधात प्रभातसिंह ठाकूर यांनी कोर्टाचं दार ठोठावलं. कोर्टानेही त्यांना या प्रकरणात मोठी शिक्षा सुनावली आहे. फतेपुरा 2014 मध्ये सुरेंद्रनगरमधून लोकसभा निवडणूक जिंकले होते. मात्र भाजपाने 2019 मध्ये त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या