'कोरोना झाल्यानंतर ममता बॅनर्जींची गळाभेट घेणार'; आज BJP नेत्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

'कोरोना झाल्यानंतर ममता बॅनर्जींची गळाभेट घेणार'; आज BJP नेत्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

काही दिवसांपूर्वी या नेत्याने धक्कादायक वक्तव्य केलं होतं.

  • Share this:

कलकत्ता, 2 ऑक्टोबर : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे नेता अनुपम हाजरा यांना कोरोनाचा लागण झाली आहे. अनुपम हाजरा यांना आताच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होते. जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची गळाभेट घेणार असल्याची घोषणा केली होती.

आता शुक्रवारी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अनुपम हाजरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेत्याच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. इतकचं नाही तर सिलिगुडीमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनुपम हाजरा यांनी टीएमसीवर निशाणा साधला होता. ते यावेळी म्हणाले होते की, आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षाही मोठा शत्रूशी सामना करीत आहेत.

ते ममता बँनर्जींसोबत लढत आहेत. भाजप नेत्याने पुढे म्हटले होते, जर कार्यकर्ते ममतांविरोधात मास्क न लावता लढू शकतात तर कोरोना विरोधातही लढू शकतात. जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जींची गळाभेट घेईन. अनुपम हाजरा गेल्या वर्षी TMC मधून भाजपमध्ये आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात बंगाल सरकारच्या कामांवर टीका करीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. भाजप नेत्याने आरोप केला आहे की, ममत सरकारने कोरोना मृतांसोबत वाईट वागणूक केली आहे. अशी वागणूक कुत्रा-मांजरांनाही दिली जात नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: October 2, 2020, 9:30 PM IST

ताज्या बातम्या