उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याच्या आधारेच सरकारला घेरणार देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याच्या आधारेच सरकारला घेरणार देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखली आहे.

  • Share this:

नागपूर, 16 डिसेंबर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काबीज केली. मात्र आता कारभार करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाला सुरुवात झाली असून स्वातंत्र्यवीर सावकरांसह इतरही मुद्द्यांवरून सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

'उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 25 हजारांची मागणी केली होती. तीच मागणी आपण लावून धरली पाहिजे,' अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना दिल्या आहेत. 'आपण तेव्हाच आक्रमक दिसू जेव्हा प्रत्येकजण आक्रमकपणे भूमिका मांडेल,' असा कानमंत्रही देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला आहे.

शिवसेनेचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर यांच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबाबत आता शिवसेनेनं भाजपवर पलटवार केला आहे. 'भाजपचं सावरकर प्रेम बेगडी आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपने हिंदुत्व शकवू नये. सावरकर यांना भारतरत्न द्या ही मागणी शिवसेनेची होती. मग मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी केला आहे. तसंच सावरकर यांच्याबाबत शिवसेनेकडून संजय राऊत यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, असंही सुनील प्रभू म्हणाले.

अधिवेशनात गदारोळ

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच सभागृहात मोठा गदारोळ झाला. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत भाजपने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र विरोधकांच्या गदारोळातही सरकारकडून कामकाज सुरू ठेवण्यात आलं आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आजपासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 02:56 PM IST

ताज्या बातम्या