धक्कादायक! आर्थिक मदतीच्या नावे कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार,आरोपी भाजप नेत्याला अटक

धक्कादायक! आर्थिक मदतीच्या नावे कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार,आरोपी भाजप नेत्याला अटक

हाथरस घटनेमुळे उत्तर प्रदेशात भाजपा बॅकफूटवर गेलं असताना भाजप नेत्याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

प्रयागराज, 04 ऑक्टोबर : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात संताप उसळला आहे. याच दरम्यान प्रयागराजमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पीडितेनं कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून भाजप नेत्याला बेड्या ठोकल्या आहेत.

हाथरस प्रकरणातील भाजपची मलिन झालेली प्रतीमा सुधारण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकार कसून प्रयत्न करत असताना आता उत्तर प्रदेशातील आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेज तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराज इथून बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचा-मित्राच्या बर्थ डे पार्टीला चालला होता आदित्य, पण वळणावर घडले भीषण आणि...

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी BAचा अभ्यास करते. पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर भाजप नेता डॉ. द्विवेदी फरार होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून फारार द्विवेदीला शनिवारी प्रयागराजमधून बेड्या ठोकल्या आहेत.

हाथरस घटनेमुळे उत्तर प्रदेशात भाजपा बॅकफूटवर गेलं आहे आणि विरोधी पक्ष यूपीच्या योगी सरकारवर सतत प्रश्न उपस्थित करत आहे. दुसरीकडे एका बलात्कार प्रकरणात भाजप नेत्याला देखील अटक केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आता काय कठोर पावलं उचलणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी उन्नावचे भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांनाही बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले गेलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 4, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या