#BREAKING : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार

#BREAKING : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार

आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह प्रवासी छावणीत राहत होते.

  • Share this:

कुलगाम, 06 जुलै: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Sajad Ahmad Khanday) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांच्या कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होता, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह प्रवासी छावणीत राहत होते. मात्र, त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते वेसूला निघून गेले. जेव्हा आपल्या घराच्या केवळ 20 मीटर अंतरावर होता तेव्हा त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.

याआधी जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजप नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. बांदीपुरा येथे पोलीस स्टेशनजवळील एका दुकानाबाहेर तिघांवर हल्ला झाला होता. यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्याचे सरपंच अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी ठार केले होते.

दरम्यान, याआधी 5 ऑगस्ट रोजी 370 कलम हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दहशतवादी संघटना घातपात करतील, याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला होता.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Published by: Priyanka Gawde
First published: August 6, 2020, 11:25 AM IST

ताज्या बातम्या