नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विट केल्यानुसार - त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येत होती. त्यांनी चाचणी केल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी पुढे लिहिले आहे की - त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय ऐश्वर्या, आराध्यासह अभिषेक बच्चनही पॉझिटिव्ह आढळून आले होते.
दरम्यान उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्षही स्वतंत्र देव हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.
मुझे कोरोना के शुरुआती लक्षण दिख रहे थे जिसके चलते मैंने अपनी कोविड-19 की जाँच कराई। जाँच में मेरी रिपोर्ट कोरोना पॉज़िटिव आई है। मुझसे संपर्क में आने वाले सभी लोगों से मेरा निवेदन है कि वह गाइडलाइन के अनुसार स्वयं को क्वारंटाइन कर ले और आवश्यकता अनुसार अपनी जाँच करा ले।
— Swatantra Dev Singh (@swatantrabjp) August 2, 2020
हे वाचा-मोठी बातमी! अमित शहांसह राजनाथ सिंहही राममंदिर भूमिपूजनात होणार नाही सहभागी
त्यातच आता अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर अमित शहा यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. याबाबत स्वत: अमित शहा यांनी ट्विट करुन विनंती केली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Coronavirus