Home /News /national /

'...तर सुशांतचा मुद्दा तयार झालाच नसता', अमित शहांनी ठाकरे सरकारला लगावला टोला

'...तर सुशांतचा मुद्दा तयार झालाच नसता', अमित शहांनी ठाकरे सरकारला लगावला टोला

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा वापर भाजपकडून बिहारच्या निवडणुकीत केला जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : बिहार निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. कोरोना काळात होत असलेल्या या निवडणुकीची देशभर चर्चा आहे. महाराष्ट्राचंही या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. कारण मूळच्या बिहारच्या असलेल्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या मुद्द्याचा वापर भाजपकडून बिहारच्या निवडणुकीत केला जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'न्यूज18'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत खुलासा केला आहे. सुशांतचा मुद्दा बिहार निवडणुकीत असेल का? असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला. त्यावर अमित शहा म्हणाले की,'मला माहीत नाही निवडणुकीत हा किती मोठा मुद्दा असेल. मात्र सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आला असता तर हा मुद्दा निर्माणच झाला नसता.' सुशांत प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतसह राज्यातील भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर आधीच घणाघात केला आहे. त्यातच आता सीबीआयकडे तपास सोपवण्याबाबत उशीर केल्याचा आरोप करत अमित शहा यांनीही उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळातही आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. 'बिहार निवडणुकीत मोदींचीच लाट' बिहार निवडणुकीबद्दल भाष्य करताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट अजूनही सर्वत्र असल्याचा दावा केला आहे. 'अजून सर्वत्र मोदींजींची लाट आहे. त्याचा आम्हाला फायदा होतो, जेडीयूलाही तो फायदा होईल. निवडणुकीनंतर भाजपचं सरकार स्थापन होईल,' असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या