दिल्लीत भाजप किती जागा जिंकणार? प्रचार संपताना अमित शहांनी सांगितला आकडा

दिल्लीत भाजप किती जागा जिंकणार? प्रचार संपताना अमित शहांनी सांगितला आकडा

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावल्या आहेत. प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे.

दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार स्थापन होईल, असा अंदाज विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र या अंदाजाला आव्हान देत दिल्लीत भाजपच्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे.

'निवडणुकीदरम्यान लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. खोटी आश्वासने, लांगूलचालन आणि अराजकता याने त्रस्त झालेल्या दिल्लीला आता फक्त विकास पाहिजे. दिल्लीमध्ये भाजपला जे समर्थन मिळत आहे त्यानुसार 11 फेब्रुवारीला भाजप दिल्लीत 45 पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेन,' असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

दिल्लीतील ओपिनियन पोल काय सांगतात?

दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. निवडणुकांपूर्वी विविध संस्थांचे ओपिनियन पोल येत असतात. या ओपिनियन पोलनी आम आदमी पार्टीवर पुन्हा एकदा दिल्लीची जनता विश्वास दाखवेल, असा अंदाज वर्तवला आहे.

टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी मजबूत असून या निवडणुकीत ते 54-60 जागांवर विजय मिळवू शकतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला 10-14 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, कॉंग्रेसला केवळ 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे ABP News- C Voter Opinion Poll च्या पोलचा अंदाज?

AAP- 42 ते 56

भाजप- 10 ते 24

काँग्रेस- 0 ते 4

First published: February 6, 2020, 6:05 PM IST

ताज्या बातम्या