मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजपचं मिशन 2024! जेपी नड्डा यांनी तयार केला 100 दिवसांचा मास्टर प्लान

भाजपचं मिशन 2024! जेपी नड्डा यांनी तयार केला 100 दिवसांचा मास्टर प्लान

महाराष्ट्रासह या राज्यावर राहाणार भाजपचा फोकस...

महाराष्ट्रासह या राज्यावर राहाणार भाजपचा फोकस...

महाराष्ट्रासह या राज्यावर राहाणार भाजपचा फोकस...

  • Published by:  Sandip Parolekar
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीत  (Bihar Assembly Election 2020)  अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर भाजपचा (BJP)आत्मविश्वास आणखी बुलंद झाला आहे. त्यामुळे भाजपनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ( Lok sabha Elections 2024) आतापासूनच तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मास्टर प्लान तयार केला आहे. नड्डा लवकरच संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. पक्ष आणखी मजबूत करणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. नड्डा हे लवकरच 100 दिवसांचा भारत दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा..सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतरही या नेत्याकडे नाही पक्क घर, आजही हाकतात नांगर रिपोर्टनुसार, जेपी नड्डा यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची काय रणनीती असेल, यावर आतापासून काम सुरू केलं आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं गमावलेल्या जागांवर जेपी नड्डा यांचा फोकस राहाणार आहे. 2024 च्या निवडणुकीत या जागा कशा काबिज करता येतील, यावर भाजपची रणनीती असणार आहे. जेपी नड्डा यांचा 100 दिवसांच्या भारत दौरा हा अत्यंत नियोजनबद्ध असणार आहे. पक्ष आणकी मजबूत करण्यासाठी ते त्या त्या स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याच बरोबर बिहार निवडणुकीत भाजपला प्रथित यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारे नड्डा लवकरच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत. नव्या संभावित युतीबाबतही ते चर्चा करतील. यासोबतच देशातील इतर राज्यातील भाजपच्या सरकारची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतील. विविध प्रभावी संघटनांच्या प्रमुखांच्या गाठी भेटी घेतील. कॅडरमध्ये पक्षाची विचारधारा अधिक स्पष्ट करतील. 4 श्रेणीमध्ये विभागले सर्व राज्य... 'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, जेपी नड्डा यांनी देशातील सर्व राज्यांची ए, बी, सी आणि डी अशा चार श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. 'ए' श्रेणीमध्ये असे राज्य की तिथे भाजपची आणि युतीची सत्ता आहे. यात नागालँड, बिहार, कर्नाटक, त्रिपुरा आदी, अशा राज्यांचा समावेश आहे. 'बी' श्रेणीमध्ये असे राज्य की तिथे भाजप सत्तेत नाही. यात राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, ओडिशा. हेही वाचा...'पापा को छोड दो', वडिलांना सोडवण्यासाठी चिमुकलीनी पोलिसांच्या गाडीवर आपटलं डोकं 'सी' श्रेणीमध्ये लहान राज्य, जसे की लक्षद्वीप, मेघालय आणि मिझोरम सारखे राज्य. तर 'डी' श्रेणीमध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसम, पुड्डुत्चेरी आणि तमिळनाडु सारखे राज्य. या श्रेणी विभागणीत उत्तर प्रदेश वगळण्यात आलं आहे. नड्डा हे 'सी' श्रेणीतील राज्यांध्ये 2 दिवस राहणार आहेत.
First published:

Tags: Maharashtra, PM narendra modi

पुढील बातम्या