News18 Lokmat

1114 Whatsapp ग्रूप्सचा हा अॅडमिन भाजपसाठी करतोय 'हे' मोठं काम

भाजपच्या आयटी सेलचं काम जोरात सुरू असतं, हे तर एव्हाना अनेक बातम्यांमधून पुढे आलं आहे. पण एक माणूस किती व्हॉट्सअॅप ग्रूप्स प्रभावीपणे सांभाळू शकतो याचं उदाहरण या भाजपच्या 'सोशल मीडिया योद्ध्या'कडे पाहिलं तर लक्षात येईल.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 03:20 PM IST

1114 Whatsapp ग्रूप्सचा हा अॅडमिन भाजपसाठी करतोय 'हे' मोठं काम

कोलकाता, 13 एप्रिल : भाजपच्या आयटी सेलचं काम जोरात सुरू असतं, हे तर एव्हाना अनेक बातम्यांमधून पुढे आलं आहे. पण एक माणूस किती व्हॉट्सअॅप ग्रूप्स प्रभावीपणे सांभाळू शकतो याचं उदाहरण या भाजपच्या सोशल मीडिया योद्ध्याकडे पाहिलं तर लक्षात येईल.

पश्चिम बंगालच्या कूच बिहारचा हा तरुण आपल्या दोन फोनवरून तब्बल 1114 व्हॉट्सअॅप ग्रूप्सचा अॅडमिन म्हणून काम करतो. दीपक दास हे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. कुठेही जाताना दीपकच्या हातात दोन स्मार्ट फोन आणि चार्जर असतो. दीपक दास भाजपचं फेसबुक आणि ट्विटर पेजसुद्धा सांभाळतात.

दीपक यांच्या एका मोबाईल नंबरवर 229 ग्रूप्स आहेत आणि दुसऱ्या नंबरवर 885 व्हॉट्सअॅप ग्रूप. प्रत्येक ग्रूपमध्ये किमान 30 ते 250 सदस्य आहेत. या सगळ्या ग्रूपचे दीपक दास अॅडमिन आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ते भाजपचा प्रभावी प्रचार करत आहेत. ते सांगतात, "तृणमूल काँग्रेस तळागाळात एवढ्या खोलवर पोहोचली आहे की, जपचा प्रचार करण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाचाच वापर प्रभावीपणे करायला हवा".Loading...

बंगालच्या वायव्येकडच्या भागात कूच बिहार जिल्हा येतो. या साऱ्या जिल्ह्यातला सोशल मीडिया प्रचार दीपक दास हा 36 वर्षीय कार्यकर्ता करत आहे. इंटरनेटचा प्रसार गावा-खेड्यात पोहोचल्यामुळे ज्या ठिकाणी पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रत्यक्ष पोहोचू शकत नाहीत, त्या काना-कोपऱ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचता येतं. "सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोहोचणारं सायलेंट वेपन आहे," दास सांगतात.


कसा करतात प्रचार?

पक्षाने केलेल्या चांगल्या कामाबद्दलच्या बातम्या पोहोचवणं, नेत्यांची भाषणं, त्यांच्या क्लिप्स शेअर करणं हे मुख्यतः आयटी सेलच्या माध्यमातून केलं जातं. पण आपण केवळ भाजपशी संबंधित बातम्याच देतो असं नाही, तर लोकांना उपयुक्त अशी इतर माहितीही वेळोवेळी देत असतो. त्यामुळे ग्रूपवर आलेले मेसेज लोक आवर्जून बघतात, असं दास सांगतात. महत्त्वाच्या बातम्याही ग्रूपवर शेअर केल्या जातात.एअरस्ट्राईकच्या माध्यमातून भारतीय सेनेनं पाकिस्तानात मोठं शौर्य दाखवल्याच्या दिवशी आमचा आयटी सेल 24 तास काम करत होता. यासंबंधीची सगळी माहिती, बातम्या आम्ही आमच्या ग्रूपवर देत होतो, असं दास सांगतात.

दीपक यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला. तेव्हा त्यांना प्रभागाचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.


VIDEO उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...