राज्यसभेतही भाजप नंबर वन ! पण एनडीएकडे अजूनही बहुमत नाहीच

आता राज्यसभेतही भाजप नंबर वनचा पक्ष ठरलाय. मध्यप्रदेशच्या राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संपतिया उइके हे निवडून आल्यानं राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या आता 58 झालीय. तर काँग्रेसची सदस्यसंख्या 57वर गेलीय. राज्यसभेत भाजप नंबर वनचा पक्ष बनला असला तरी या सभागृहात अजूनही एनडीएकडे निर्णायक बहुमत आलेलं नाही.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2017 01:13 PM IST

राज्यसभेतही भाजप नंबर वन ! पण एनडीएकडे अजूनही बहुमत नाहीच

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : आता राज्यसभेतही भाजप नंबर वनचा पक्ष ठरलाय. मध्यप्रदेशच्या राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संपतिया उइके हे निवडून आल्यानं राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या आता 58 झालीय. तर काँग्रेसची सदस्यसंख्या 57वर गेलीय. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आलेत. नरेंद्र मोदी सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून राज्यसभेत सर्वाधिक भाजपचे खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, राज्यसभेत भाजप नंबर वनचा पक्ष बनला असला तरी या सभागृहात अजूनही एनडीएकडे निर्णायक बहुमत आलेलं नाही. मात्र जेडीयू सोबत आल्याने भाजपची ताकद नक्कीच वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे 2018 पर्यंत राज्यसभेत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली.

दुसरीकडे, तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षही एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यसभेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होईल. सध्या अनेक महत्वाच्या विधेयकांच्या वेळी अण्णा द्रमुकने भाजपला साथ दिलेली आहे. मात्र ते अधिकृतरित्या एनडीएचे सदस्य नाहीत. अण्णा द्रमुकचे राज्यसभेत 12 खासदार आहेत.

राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदी सरकारची अनेक महत्वपूर्ण विधेयक लटकली वरिष्ठ सभागृहात मंजुरीविना लटकली आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते. दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या ९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील ९ पैकी ८ जागांवर भाजपचा उमेदवार निवडणूक येऊ शकतो. गुजरातमध्येही तीन जागांसाठी सध्या निवडणूक लागलीय. तिथल्या निकालांकडेही भाजपचं लक्षं लागलंय. तिथे भाजपतर्फे पक्षाध्यक्ष अमित शहा तर काँग्रेसकडून सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार अहमद पटेल मैदानात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...