पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच घुसखोर, काँग्रेसच्या आरोपाने भाजपचा भडका

पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच घुसखोर, काँग्रेसच्या आरोपाने भाजपचा भडका

'चौधरी यांचा मेंदू सडला असून त्यांनी तातडीने त्यावर उपचार करावे आणि मगच संसदेत यावे. काँग्रेस यावर अकारण वाद निर्माण करत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 01 डिसेंबर : NRCच्या मुद्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केलाय. अमित शहा यांनी सर्व देशात NRC राबविण्याचे संकेत अनेकदा दिले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी तीव्र टीका केलीय. ही टीका करताना ते मोदी आणि शहांवर चांगलेच घसरले. मोदी आणि शहा हेच खरे घुसखोर असून ते गुजरातमधून दिल्लीत आले आहेत. पहिले त्यांनाच त्यांच्या राज्यात परत पाठवलं पाहिजे अशी टीका त्यांनी केली. चौधरी यांच्या या टीकेवर भाजपचा भडका उडाला असून चौधरी यांच्यावर भाजपने पलटवार केलाय.

भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी जोरदार टीका केलीय. चौधरी यांचा मेंदू सडला असून त्यांनी तातडीने त्यावर उपचार करावे आणि मगच संसदेत यावे अशी टीका त्यांनी केलीय. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आसाममध्ये NRC लागू करत सर्व नागरिकांच्या त्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून देशभर वादळ निर्माण झालं होतं. आता हाच कायदा सर्व देशभर लागू करण्याचे संकेत अमित शहा यांनी दिल्याने त्यावर वाद निर्माण झालाय.

काँग्रेस यावर अकारण वाद निर्माण करत असून जगभरात आपल्या देशांच्या नागरीकांचं रजिस्टर मेंटेन केलं जातं NRC म्हणजे नागरीकांची यादी तयार करणं आहे असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 1, 2019, 10:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading