S M L

अमित शहांचा कार्यकाळ वाढला, 2019च्या निवडणुकांमध्येही 'किंग मेकर'

Updated On: Sep 8, 2018 06:36 PM IST

अमित शहांचा कार्यकाळ वाढला, 2019च्या निवडणुकांमध्येही 'किंग मेकर'

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : भाजप केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुका लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी भाजपची केंद्रीय कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत अमित शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळे आता 2019च्या निवडणुकांध्ये अमित शहाच बिग बॉस असणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधी केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत तसा प्रस्तावही देण्यात आला होता.

अमित शाह यांचा कार्यकाळ जानेवारी 2019 मध्ये संपतो. पण लोकसभा निवडणुका असल्यामुळे भाजप अध्यक्षाची निवडणूक ही एक वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांचा कार्यकाळ हा वाढला आहे.

'आम्हाला निवडणुका लक्षात घेऊन संघटना तयार करायची आहे. काही राजकीय पक्ष आमच्याविरोधात लोकांची दिशाभूल करत आहेत, परंतु आम्ही पुन्हा पुन्हा सत्तेवर येऊ' असं अमित शहा यांनी कार्यकारिणी बैठकीत म्हटलं आहे. आम्ही भाजप कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेणाऱ्या लोकांपर्यंत पोहचवणार आणि या सगळ्याचा एक डेटाबेसदेखील तयार करणार असल्याचं अमित शहा म्हणाले.

काही लोक जातींमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण त्याचा कोणताही परिणाम आम्ही निवडणुकांवर होऊ देणार नाही असं म्हणत भाजप लोकसभा निवडणुका सगळ्यांना एकत्र घेऊन लढणार आहे. 2014च्या निवडणुकांपेक्षाही अधिक बहुमत मिळवण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचंही शहा म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने हा एक महत्त्वपूर्ण संकल्प केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या सभेत 'अजिंक्य भाजप' असा नाराही देण्यात आला.

Loading...
Loading...

बैठकीत यावर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राज्यस्थानसह 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण जोर लावण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. 2019मध्ये सगळ्याच ठिकाणी भाजप राज्य करणार असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे 2019मध्ये येऊ घातलेली लोकसभा निवडणूक भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची असणार आहे.

 

दीदींनी नखरे केले नसते तर... आशा भोसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close