पोटनिवडणुकीत भाजप फेलच, 4 वर्षांचं हे आहे रिपोर्ट कार्ड !

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं की, "भाजपसाठी पोटनिवडणूक जिंकणे काही अवघड नाही" पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 31, 2018 02:43 PM IST

पोटनिवडणुकीत भाजप फेलच, 4 वर्षांचं हे आहे रिपोर्ट कार्ड !

मुंबई, 31 मे : मागील 4 वर्षांच्या पोटनिवडणुकीचा आढावा जर आपण घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपची कामगिरी खराब राहिली आहे.

2014 पासून झालेल्या पोटनिवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने आपल्या स्वत:च्या 4 जागी पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या झटका बसला होता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबादमधील फुलपुर क्षेत्रात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तसंच बिहारमधील अररिया मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत पण भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपला 2014 मधील लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर मात्र पोटनिवडणुकीत सलग पराभवाचाच सामना करावा लागत आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं की, "भाजपसाठी पोटनिवडणूक जिंकणे काही अवघड नाही" पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असल्याचं आत्तापर्यंतच्या पोटनिवडणुकीतील निकालावरून स्पष्ट होतं आहे. 2014 पासून 23 जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त 4 जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यांनी लोकसभेत जिंकलेल्या स्वत:च्या  6 जागा गमावलेल्या आहेत. ज्या काँग्रेसला मिळाल्या आहेत.

एक नजर टाकूया आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीतील आकड्यांवर :-

Loading...

2014 :-

बीड, महाराष्ट्र

2014: भाजप

पोटनिवडणूक: भाजप

कंधमाल, ओडिसा

2014: बीजेडी

पोटनिवडणूक: बीजेडी

मेढ़क, तेलंगणा

2014: TRS

पोटनिवडणूक: TRS

बडोदा, गुजरात

2014: भाजप

पोटनिवडणूक: भाजप

मैनपुरी, उत्तर प्रदेश

2014: सपा

पोट-निवडणूक: सपा

2015 :-

रतलाम, मध्य प्रदेश

2015: भाजप

पोटनिवडणूक: काँग्रेस

वारंगल, तेलंगणा

2014: टीआरएस

पोटनिवडणूक: टीआरएस

बनगाव, पश्चिम बंगाल

2014: एआयटीसी

पोटनिवडणूक: एआयटीसी

2016 :-

लखिमपूर, आसाम

2014: भाजप

पोटनिवडणूक: भाजप

शहडोल, मध्य प्रदेश

2014: भाजप

पोटनिवडणूक: भाजप

कुच बिहार, पश्चिम बंगाल

2014: एआयटीसी

पोटनिवडणूक: एआयटीसी

तामलुक, पश्चिम बंगाल

2014: एआयटीसी

पोटनिवडणूक: एआयटीसी

तुरा, मेघालय

2014: एनपीपी

पोटनिवडणूक: एनपीपी

2017 :-

अमृतसर, पंजाब

2014: इन्क

पोटनिवडणूक: काँग्रेस

गुरदासपूर, पंजाब

2014: भाजप

पोटनिवडणूक: काँग्रेस

श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर

2014: पीडीपी

पोटनिवडणूक: नॅशनल कॉन्फरन्स

मल्लपुरम, केरळ

2014: आययूएमएल

पोटनिवडणूक: आययूएमएल

2018 :-

अलवर, राजस्थान

2014: भाजप

पोटनिवडणूक: काँग्रेस

अजमेर, राजस्थान

2014: भाजप

पोटनिवडणूक: काँग्रेस

उलुबारीया, पश्चिम बंगाल

2014: एआयटीसी

पोटनिवडणूक : एआयटीसी

गोलखापूर, उत्तर प्रदेश

2014: भाजप

पोट-निवडणूक: एसपी

फुलपुर, उत्तर प्रदेश

2014: भाजप

पोट-निवडणूक: एसपी

अररिया, बिहार

2014: राजद

पोटनिवडणूक: आरजेडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...