गुवाहाटी, 11 ऑक्टोबर : सरकारतर्फे चालवले जाणारे किंवा पाठिंबा असणारे मदरसे बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आसाम सरकारचे मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यापासून आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद केले जाणार आहेत यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वजनिक पैशांचा वापर धार्मिक शास्त्र आणि ग्रंथ शिकवण्यासाठी आता यापुढे सरकार खर्च करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
सरकारनं ही अधिसूचना जारी केल्यानंतर ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF)च्या प्रमुखांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. 'भाजपप्रणीत सरकारने मदरसे बंद केली तर त्यांचा पक्ष पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका जिंकेल आणि सत्तेत आल्यानंतर पुन्हा मदरसे सुरू कऱण्यात येतील' असं विधान AIUDF चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी केलं आहे.
We will close down State-run madrassas in Assam from November. The government will release a notification in this regard: #Assam Minister Himanta Biswa Sarma pic.twitter.com/CukmgSnJG0
— ANI (@ANI) October 10, 2020
हे वाचा-'या' कारणामुळे शाळेने 50 विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पाठवले घरी?
सरकारकडून चालवले जाणारे मदरसे सरकार बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यातच सांगण्यात आली होती. धर्मनिरपेक्ष देशात सर्वसामान्य जनतेच्या पैशातून धार्मिक शिक्षणासाठी निधी देणं योग्य नाही त्यामुळे यावर खर्च करता येणार नाही असंही हिमंता यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं.
सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याचं भाजप सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या संदर्भात एक पत्रकही जाहीर करण्यात आलं असून भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP