या राज्यात NOTAला मिळाली भाजप, काँग्रेसपेक्षा जास्त मतं

देशात नरेंद्र मोदींची जादू चालली असली तरी आंध्र प्रदेशमध्ये मात्र जनतेनं भाजप, काँग्रेसला नाकारलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 04:52 PM IST

या राज्यात NOTAला मिळाली भाजप, काँग्रेसपेक्षा जास्त मतं

अमरावती, 25 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं. 2014ची तुलना करता 2019मध्ये भाजपला 8 जागा जास्त मिळाल्या. तर, NDAनं 350चा आकडा गाठला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा पंतप्रधान होण्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साह संचारला. या विजयामुळे मोदींवर मतदारांचा विश्वास असल्याचं सिद्ध झालं. पण, असं एक राज्य आहे ज्या ठिकाणी भाजप, काँग्रेसला NOTAपेक्षा देखील जास्त मतं मिळाली आहेत. धक्का बसला ना? होय, आंध्र प्रदेश हे ते राज्य होय! या राज्यात नरेंद्र मोदींची जादू चाललीच नाही. हे आम्ही नाही तर निवडणूक आयोगानं दिलेली आकडेवारी सांगत आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या YSRकाँग्रेसनं लोकसभेसह विधानसभेत देखील दणदणीत विजय मिळवला. यावेळी TDSला आपल्या कामगिरीतील सातत्य राखता आलं नाही. देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं जबरदस्त कामगिरी केली असली तरी आंध्र प्रदेशात मात्र जगनमोहन रेड्डीनांच जनमताचा कौल मिळाला.


नरेंद्र मोदींचा ‘जबरा फॅन’; छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’

NOTA आणि भाजप काँग्रेसला किती मंत मिळाली?

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. लोकसभेमध्ये NOTA अर्थात NONE OF THE ABOVEहा पर्याय 1.5 टक्के लोकांनी निवडला. त्यामुळो नोटाची तुलना करता भाजपला 0.96 टक्के मतं मिळाली. तर, भाजपपेक्षा काही प्रमाणात बरी कामगिरी ही काँग्रेसनं केली आहे. कारण, काँग्रेसला 1.29 टक्के मतं ही लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली आहेत.

Loading...


निवडणूक संपताच कथित गोरक्षकांची दादागिरी; महिलेसह 2 मुस्लीम तरुणांना मारहाणतर, विधानसभेच्या 175 जागा या आंध्र प्रदेशात आहेत. विधानसभेत 1.28 टक्के लोकांनी नोटा हा पर्याय निवडला. तर, भाजपला 0.84 टक्के मतं मिळाली आणि काँग्रेसला 1.17 टक्के मतं मिळाली. त्याचा परिणाम हा दोन्ही पक्षांच्या कामगिरीवर झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 2.8 टक्के मतं मिळाली होती.


संतापजनक! कथित गोरक्षकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...