Home /News /national /

भाजप जिल्हाध्यक्षांवर दहशतवादी हल्ला, वडिल आणि भावासह तिघांचा मृत्यू

भाजप जिल्हाध्यक्षांवर दहशतवादी हल्ला, वडिल आणि भावासह तिघांचा मृत्यू

वासिम अहमद असं भाजप जिल्हाध्यक्षांचं नाव आहे. वासिम यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे.

    बांडीपोरा, 08 जुलै : जुम्मू काश्मीरच्या बांडीपोरामध्ये दहशतवाद्यांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांडीपोरा जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या दोन कुटुंबातील सदस्यांवर (भाऊ आणि वडील) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अचानक झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. भाऊदेखील भाजपमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वासिम अहमद असं भाजप जिल्हाध्यक्षांचं नाव आहे. वासिम यांच्यावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडिल आणि भावाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर तिन्ही वडील व मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथून त्यांना श्रीनगर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. इथल्या डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. याची पुष्टी करताच काश्मीर शाखेचे प्रभारी मंजूर भट यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शोक व्यक्त केला. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या