News18 Lokmat

लोकसभा 2019: अडवाणींच्या पाठोपाठ वाजपेयींच्या भाच्याचा पत्ता कट!

मुरैना येथील विद्यमान खासदार आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाचे अनुप मिश्रा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 10:21 PM IST

लोकसभा 2019: अडवाणींच्या पाठोपाठ वाजपेयींच्या भाच्याचा पत्ता कट!

भोपाळ, 23 मार्च: लोकसभेसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेश, गोवा आणि हरियाणा या राज्यातील उमेदवारांची समावेश आहे. यातील सर्वात धक्कादायक म्हणजे मुरैना येथील विद्यमान खासदार आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाचे अनुप मिश्रा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर वाजपेयी यांच्या कुटुंबीयांना बाजूला केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मिश्रा यांचा पत्ता कट होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मिश्रा यांच्या जागी आता मुरैना येथून मोदी मंत्रिमंडळातील नरेंद्र सिंह तोमर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तोमर सध्या ग्वालियर येथून खासदार आहेत. याआधी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी पक्षाला राम राम केला होता. शुक्ला यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकाचा निकाल पाहता तोमर ग्वालियरमधून निवडणूक लढवणार नाहीत. पण तेव्हा मिश्रा यांच्या जागी तोमर यांना संधी मिळेल अशा प्रकारची कोणतीही चर्चा नव्हती. तोमर यांना भोपाळमधून संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तोमर यांनी 2009मध्ये मुरैना येथून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

अनुप मिश्रा आधापासूनच शिवराज यांच्या निशाण्यावर होते. केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सरकार आल्यानंतर मुरैनाच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी अशी वागणूक केली जसे ते काँग्रेसचे खासदार आहेत. अनुप यांच्यासोबत माजी खासदार आयएएस अधिकारी भगीरथ प्रसाद यांचंही तिकीट कापण्यात आलं आहे. 2014मध्ये भाजपने भगीरथ यांच्याकडून काँग्रेसचं तिकीट कापून त्यांना आपल्या गोटात पुन्हा आणलं होतं.

बैतूलमधून 2 वेळा खासदार राहिलेल्या ज्योती धुर्वे याचंदेखील तिकीट कापण्यात आलं आहे. खोट जात प्रमाणपत्र दाखवल्याप्रकरणी ज्योती धुर्वे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

Loading...

पहिल्या यादीमध्ये उज्जैनमधूनदेखील नवा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या यादीतून हे स्पष्ट आहे की, मध्यप्रदेशच्या 29 पैकी 29 जागा जिंकण्याचे अमित शहा यांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या शक्यता आता कमी झाल्या आहेत.


VIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2019 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...