भाजपचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, शेअर केला 'हा' फोटो!

भाजपचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, शेअर केला 'हा' फोटो!

सत्ताधारी भाजपने सोशल मीडियावर एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे: सत्ताधारी भाजपने सोशल मीडियावर एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. एक राजकीय पक्ष म्हणून ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा पक्ष भाजप ठरला आहे. ताज्या आकडेवारीनुसार ट्विटवर भाजपचे 11 मिलियन म्हणजेच 1 कोटी १० लाख 8 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. देशातील कोणत्याच राजकीय पक्षाकडे इतके फॉलोअर्स नाहीत.

यासंदर्भात भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही माहिती दिली. भाजपने केलेल्या या विक्रमाबद्दल त्यांनी सर्व फॉलोअर्सचे आभार मानले.

ट्टिवटरवर भाजपकडे काँग्रेसच्या तुलनेत दुप्पट फॉलोअर्स आहेत. काँग्रेसच्या फॉलोअर्सची संख्या 5.14 कोटी इतकी आहे. जगभरातील इतर देशातील राजकीय पक्षाचा विचार करता अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या 16 हजार 327 इतकी आहे तर डेमॅक्रॅटिक पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या 16 लाख इतकी आहे.

राजकीय नेत्यांचा विचार केल्यास पंतप्रधान मोदी ट्विटवर सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 47.2 मिलियन इतकी आहे. भारतात कोणत्याही राजकीय नेत्याला इतके लोक ट्विटवर फॉलो करत नाहीत. जगाचा विचार केल्यास ट्विटवर फॉलोअर्स बाबत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या स्थानावर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 106 मिलियन इतकी आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 9.4 मिलियन इतकी आहे.

VIDEO : 'काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेत कुणालाच न्याय मिळाला नाही'

First published: May 12, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading