भाजपचे 112 उमेदवार फायनल होणार, दिल्लीत तयार होतोय प्रचाराचा 'मास्टर प्लॅन'

भाजपचे 112 उमेदवार फायनल होणार, दिल्लीत तयार होतोय प्रचाराचा 'मास्टर प्लॅन'

सगळ्यांना उत्सुकता आहे ती युतीच्या जागावाटपाची. या बैठकीत अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय कानमंत्र दिला त्यावरच अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 26 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीची  बैठक आज संध्याकाळी दिल्लीत झाली. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात ही बैठक झाली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतेय. दुपारी 1 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक, आदी नेते उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये जवळपास 112 उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पुन्हा एक बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

पंकजा मुंडेंसमोर पेच.. भाजपच्या बालेकिल्ल्यात 'या' जागेवर घटक पक्षांची रस्सीखेच

भाजपच्या नावांवर चर्चा करण्याबरोबरच 'युती'च्या जागावाटपाच्या चर्चेच्या प्रगतीबाबतही या बैठकीत चर्चा झाली झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात असून शेवटच्या काही जागांवर शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात या वाटाघाटी सुरू आहेत आणि लवकरच तोडगा निघण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

या बैठकीत भाजपच्या प्रचाराचा मास्टर प्लानही ठरवला जाणार आहे. प्रचाराचे मुद्दे, विरोधकांवर करण्याचा हल्लाबोल आणि इतर व्ह्युरचनेवर या बैठकीत आराखडा तयार केला जाणार आहे.

साताऱ्यातून उदयनराजेंना शह देण्यासाठी शरद पवार स्वतः उतरणार रिंगणात?

युतीचं घोडं अडलं ते पाच जागांवर

भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलीय. शेवटच्या 11 जगांचा प्रश्नं काही प्रमाणात सुटून तो आता फक्तं 5 जागांच्या तडजोडीवर आलाय. आता 5 विधानसभा मतदारसंघातील तीढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या अंतीम चर्चेतून सोडवला जाणार आहे. युतीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांनी युती तूटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतल्यामुळे युती अभेद्य रहाणार असल्याचं दिसतंय. दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे परिस्थिती बदललीय या बदलत्या परिस्थित काही अडचणी असल्याने हा विलंब होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तुटेपर्यंत ताणणार नाही असं दोन्ही पक्षांनी ठरविल्यामुळे युती तुटणार नाही हे निश्चत समजलं जातंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 26, 2019, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading