महाराष्ट्राबाहेरही भाजपला आहे 'अजित पवार - 2' ची भीती; अमित शाहांचं सावध पाऊल

महाराष्ट्राबाहेरही भाजपला आहे 'अजित पवार - 2' ची भीती; अमित शाहांचं सावध पाऊल

ज्योतिरादित्य यांनी अधिकृतपणे पक्षात केला तरी अद्याप मध्य प्रदेशातल्या भाजपने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. महाराष्ट्रात फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर उलटलेला डाव भाजपचं केंद्रीय नेतृत्व अद्याप विसरलेलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मार्च : मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य समर्थक 21 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. आता मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. ज्योतिरादित्य यांनी अधिकृतपणे पक्षात केला तरी अद्याप मध्य प्रदेशातल्या भाजपने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. आपल्याकडे किती आमदार असा आकडाही जाहीर केलेला नाही. महाराष्ट्रात फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर उलटलेला डाव भाजपचं केंद्रीय नेतृत्व अद्याप विसरलेलं नाही हे यातून स्पष्ट होतं.

नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात कुठल्याच एका पक्षाला बहुमत नव्हतं त्या वेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी काही आमदार आपल्या पाठिशी आहेत, असा दावा करत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी केली. या पाठिंब्यावर रात्रीत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आणि शपथविधीही झाला. पण अजित पवार यांनी दावा केला, तेवढे आमदार काही भाजपला येऊन मिळाले नाहीत.

वाचा - ज्योतिरादित्यांचा थाटमाट! डोळे दिपवणारं वैभव, उद्योगपतींपेक्षा जास्त संपत्ती

मध्य प्रदेशातले काँग्रेस आमदार गायब आहेत, तसे त्या वेळी राष्ट्रवादीचे काही आमदारी गायब होते. पण अखेर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या आमदारांचं मन वळवत त्यांना भाजपकडे जाण्यावाचून रोखलं आणि अजित पवार एकटे पडले. ते आवश्यक आमदारांचं बळ देऊ शकले नाहीत आणि भाजप सरकार अवघ्या दोन दिवसात कोसळलं. हा धोका आता मध्य प्रदेश भाजप पत्करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे सत्तास्थापनेची कोणतीही घाई ते करताना दिसत नाहीत.

वाचा - मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल का? शरद पवारांनी दिले उत्तर

दुसरीकडे मुख्यमंत्री कमलनाथ मात्र 'गायब झालेले आमदार संपर्कात आहेत. शिवाय भाजपचे काही आमदारही संपर्कात असल्याचा' दावा करत काँग्रेस सरकार पडणार नाही, असं ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात आता काय घडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

असं आहे सत्तेचं गणित

मध्य प्रदेश विधानसभेत सद्यस्थितीत बहुमतासाठी 115 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता हे गणित बदलणार आहे. काँग्रेस आघाडीचं संख्याबळ 99 वर येणार आहे. भाजपला 107 जागा मिळाल्या आहेत. आता 22 आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर 206 आमदारांचीच विधानसभा राहील. त्यामुळे बहुमताचा आकडा 104 वर येईल. भाजपकडे 107 आमदार आहेत. म्हणजेच सहज ते बहुमत चाचणी पार पाडतील.

पण असं असूनही काँग्रेस सरकार अस्थिर आहे, अल्पमतात आहे अशी ओरड करणारे भाजप नेते अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेले नाहीत. कदाचित महाराष्ट्रातल्या अनुभवानंतर ताकही फुंकून पिण्याचा शीर्षस्थ नेत्यांचा आदेश असावा.

पुन्हा निवडणूक होणार का?

मध्य प्रदेशात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून कमलनाथ मास्टरस्ट्रोक खेळू शकतात, असा काही राजकीय विश्लेषकांचा तर्क आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला तर मध्य प्रदेश विधानसभा विसर्जित होऊ शकते. तसं झालं तर मध्यावधी निवडणुकीला पर्याय उरणार नाही.

वाचा - महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन लोटस, पंकजा मुंडेंनी दिले संकेत

ज्योतिरादित्य यांचे समर्थक आमदार मुख्यतः ग्वाल्हेर भागातले आहेत. इथे भाजपच्या नेत्यांचंही वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकांच्या आधीच पुन्हा नाराजीचं राजकारण रंगू शकतं. त्यातून फोडाफोडीही अटळ असेल आणि दोन्ही पक्षांना ती परवडणारी नाही. म्हणूनच कदाचित भाजपने मध्य प्रदेशात अद्याप तरी सावध पवित्रा घेतला आहे.

अन्य बातम्या

भाजप प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदे झाले भावुक; मोदींवर उधळली स्तुतिसुमनं

दिल्ली हिंसाचाराने पेटली तेव्हा पोलीस काय करत होते? अमित शाहांनी दिलं उत्तर

First published: March 12, 2020, 7:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading