महाराष्ट्राची सत्तास्थापना नाही तर 'हा' मुद्दा अमित शहांच्या टार्गेटवर

मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचं शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. पण भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचं लक्ष सध्या दुसरीकडे आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 09:30 PM IST

महाराष्ट्राची सत्तास्थापना नाही तर 'हा' मुद्दा अमित शहांच्या टार्गेटवर

पायल मेहता, नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेला विलंब करण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचं शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झालं असताना भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा मात्र या सगळ्यापासून दूर असल्याचं दिसत आहे. अशातच एक नवी माहिती समोर आली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपलं पूर्ण लक्ष सध्या राम मंदिर आणि नागरिक दुरुस्ती विधेयक या दोन मुद्द्यांवर केंद्रीत केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अमित शहा दिल्लीतच व्यस्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. कारण मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवणं शक्य झालेलं नाही. अशातच आमच्याकडे भाजपलाही पर्याय आहे, असा दावा शिवसेनेकडून करणयात येत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं सत्तासमीकरणही नाकारता येत नाही.

दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच हरियाणातही विधानसभा निवडणुका झाल्या. तिथेही सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. तिथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणातील प्रादेशिक पक्ष जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेतला. हरयाणात सध्या भाजपचा मुख्यमंत्री तर जेजेपीचा उपमुख्यमंत्री आहे. याची घोषणा खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या. पण निकालानंतर मात्र असं सत्ता स्थापनेसाठी दिल्लीतून हालचाली होताना दिसत नाहीत.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...