Home /News /national /

निवडणुकांच्या तोंडावर भाजपने तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

निवडणुकांच्या तोंडावर भाजपने तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

गेल्या काही दिवसात झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने केलेले हे खांदेपालट महत्त्वपूर्ण मानले जातेय.

19 एप्रिल : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने केलेले हे खांदेपालट महत्त्वपूर्ण मानले जातेय. मध्य प्रदेशात नंदकुमार सिंह चौहान यांच्या जागी जबलपुरचे खासदार राकेश सिंह यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. राकेश सिंह हे कुशल संघटक असून पक्षाचे लोकसभेतले मुख्य प्रतोद आहेत, तर दुसरीकडे भाजपचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष अशोक परामनी, आणि आंध्र प्रदेशचे के. हरिबाबू यांनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.या दोघांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेण्यात आलेय. त्यांच्या जागी लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षची घोषणा केली जाणार आहे. हरिबाबू यांच्या जागी 2014ला काँग्रेसमधून भाजपात आलेले कन्ना लक्ष्मी नारायण आंध्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. राजस्थान, मध्य प्रदेशात 2018ला तर आंध्रामध्ये 2019ला विधानसभा निवडणुका होऊ घातल्याच. आंध प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने भाजपा एनडीएची साथ सोडल्याने तिथे भाजपची कसोटी लागणार आहे.
First published:

Tags: BJP, Party head, States, प्रदेशाध्यक्ष, बदल, भाजप

पुढील बातम्या