भाजपचे चाणक्य आता कोरोनाला रोखणार; ठरवली रणनीती, चार IAS अधिकाऱ्यांना केलं पाचारण

भाजपचे चाणक्य आता कोरोनाला रोखणार; ठरवली रणनीती, चार IAS अधिकाऱ्यांना केलं पाचारण

देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर तातडीने कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जून : दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने 4 आयएएस अधिकाऱ्यांची दिल्ली येथे बदली करण्याचे आदेश दिले आहेत.

गृह मंत्रालयाच्या मते, अवनीश कुमार आणि मोनिका प्रियदर्शिनी यांना अंदमान निकोबार, गौरव सिंह राजावत आणि विक्रमसिंह मलिक यांना अरुणाचल प्रदेशहून दिल्ली येथे बोलविण्यात आले आहे. हे अधिकारी दिल्लीतील कोरोना परिस्थितीशी सामना करण्यास मदत करतील.

गृहमंत्रीदेखील केंद्रात तत्कालीन वरिष्ठ आयएएस अधिकारी एससीएल दास आणि एसएस यादव यांनाही दिल्ली सरकारसह काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीतील कोरोनाची स्थिती सतत बिघडत चालली आहे. राजधानीत गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे 2000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर आहेत. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 38958 पर्यंत पोहोचली आहे. यापैकी 14945 लोक साथीच्या आजारातून बरे झाले आहेत, तर 1271 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमित शहा यांची कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि विशेषतः दिल्लीतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर आज सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत बैठक घेतली. सुमारे एक तास आणि 20 मिनिटे चाललेल्या या बैठकीत दिल्लीतील कोरोनाची वाढती संख्या थांबविणे, चाचण्यांमध्ये सुधार करणे, रुग्णालयांमध्ये बेड सुनिश्चित करणे आणि उर्वरित आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यावर भर देण्यात आला.

दिल्लीला तातडीने 500 रेल्वे आयसोलेशन कोच दिले जात आहेत. याव्यतिरिक्त, केंद्राकडून येथे कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात मदत करण्यात येणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन हे या बैठकीला उपस्थित होते.

हे वाचा-इरफान खानच्या निधनानंतर सुशांत सिंहला मिळाला होता हा चित्रपट, मात्र आता...

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 14, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या