गुजरात निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदारांचाच बोलबाला

"या निवडणुकीसाठी भाजप 'नो रिपिट पॉलिसी' हा फॉर्म्युल्यानुसार 30 ते 40 टक्के नवे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा होती, पण जर..."

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2017 06:50 PM IST

गुजरात निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदारांचाच बोलबाला

17 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. निवडणुकीला अवघा एक महिना उलरलेला असताना अखेर भाजपनं आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना राजकोटच्या पश्चिमेस उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मेहसाणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी भाजप 'नो रिपिट पॉलिसी' हा फॉर्म्युल्यानुसार 30 ते 40 टक्के नवे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा होती, पण जर पहिल्या यादीवर नजर टाकली तर जास्तीत जास्त विद्यमान आमदारच मैदानात उतरवले असल्याचं दिसून येतं. तसंच 55 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं तर 15 नव्या चेहऱ्यांना संधी दिलीये.

तोंडावर आलेल्या गुजरात निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींनी गुजरामध्ये दमदार प्रचारसभा घेतली, पाटीदार नेता हार्दिक पटेलने त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांच्या अपमानाचा मुद्दा मांडुन आधीच सहानभुती मिळवली आहे. त्यामुळे या सगळ्यांत भाजप मात्र चांगलंच धास्तावलं आहे.

या सगळ्यामुळे भाजपासमोर काँग्रेस आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलने मोठं आव्हान निर्माण केलं हे खरं आहे, मात्र हार्दिक पटेलची सेक्स सीडीसमोर आल्यामुळे गुजरातकर नाराज झाले हेही तितकचं खरं आहे.

त्यामुळे या निवडणुकीत राजकारणाची समीकरणं काय असतील यावर पुन्हा सगळ्यांच लक्ष लागलंय.  भाजपसमोर सत्ता टिकवण्याचं तर काँग्रेससमोर स्वत:ला पुर्नस्थापित करण्याचं आव्हानं या गुजरात निवडणुकांमुळे उभ ठाकलं आहे. त्यामुळे गुजरात मध्ये कोण बाजी मारणार आणि तो पर्यंत आणखी कोणते राजकीय डावपेच आपल्याला पहायला मिळणार हेच बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...