भोपाळ, 22 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीचे आणि त्याबरोबरच मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच एका भाजप उमेदवाराचा (BJP Bisahu lal singh) हातात रिव्हॉल्व्हर घेऊन कार्यकर्त्यालाच धमकावतानाचा VIDEO समोर आला आहे. खासगी चर्चा किंवा बैठकीदरम्यानचा हा VIDEO कुणीतरी गुपचूप मोबाईल कॅमेऱ्यावर शूट केलेला आहे. पण यात हे मंत्रीपदावरचे भाजप नेते सर्रास शिव्या घालत खिशातून बंदूक काढताना दिसत आहेत. आता या VIDEO ची दखल घेत काँग्रेसने भाजपवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांनी हा VIDEO शेअर करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं जाहीर केलं आहे.
मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणारे नेते बिसाहूलाल सिंह यांचा हा VIDEO असल्याचं सांगितलं जात आहे. मोबाईल कॅमेऱ्यावर शूट केलेला असल्याने VIDEO स्पष्ट नाही. पण यामध्ये बिसाहूलाल आपल्याच कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर उगारताना दिसतात. जास्त बोलशील तर गोळी मारेन, अशी थेट धमकी देतानाही यात ऐकू येत आहे. या व्हिडीओची क्लिप काँग्रेसच्या हाती लागल्याने आता याविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहे.
भाजपा प्रत्याशी एवं @ChouhanShivraj की सरकार में मंत्री बिसाहू लाल सिंह कभी गालियाँ दे रहे हैं, कभी भगवान राम की माताओं पर आपत्तिजनक भाषा का उपयोग कर रहे हैं, तो कभी कार्यकर्ताओं को रिवाल्वर लेकर धमका रहे हैं॥ भाजपा का चाल चरित्र और चेहरा सबके सामने है॥ #Pcsharmaincpic.twitter.com/ZA2GtUhKiO
बिसाहूलाल सिंह सध्या शिवराज सिंह सरकारमध्ये आहेत. शिवाय ते पोटनिवडणुकीसाठी उभे आहेत. अनुपपूरच्या जागेवरून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
एका कार्यकर्त्याला काही रक्कम आणण्यास सांगताना दे दिसतात. जास्त बोललास तर गोळ्या घालीन, अशी धमकीची भाषाही ऐकू येते. या VIDEO ची शहानिशा अद्याप झालेली नसली, तरी काँग्रेसकडून हा VIDEO शेअर करण्यात येत आहे.
यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे अर्वाच्य भाषेत काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबद्दल ते बोलले होते. त्याविरोधातही काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी यात आता लक्ष घातलं आहे. भाजप निवडणूक बंदुकीच्या जोरावर लढत आहे काय? कार्यकर्ते आणि मतदारांना कशा प्रकारे धमकावण्यात येत आहे हे या video तून समोर आलं आहे, असं कमनाथ यांच्यातर्फे सांगण्यात आलं.