• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • साध्वीच्या पोस्टरवर काँग्रेसची टॅगलाईन? भाजप नेत्याचं ट्वीट

साध्वीच्या पोस्टरवर काँग्रेसची टॅगलाईन? भाजप नेत्याचं ट्वीट

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 एप्रिल : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मालेगाव बाँबस्फोटात बळी गेलेल्याच्या वडिलांनीही NIA कोर्टात साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसला विरोध करण्यासाठी त्यांच्याच टॅगलाईनचा वापर केला आहे. काँग्रेसने सरकार आल्यास गरीबांना महिन्याला सहा हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच आता न्याय मिळणार असं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेसने न्याय असं नाव या योजनेला नाव दिलं आहे. त्याचाच वापर करून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते तेजिंदर सिंह बग्गा यांनी एक ट्विट केलं आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरचा फोटो असून त्यावर अब होगा न्याय असं लिहलं आहे. ही पोस्टर्स दिल्लीतील अनेक भागात लावण्यात आली आहेत. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमीच हिंदू दहशतवादावरून भाजपला लक्ष्य केलं आहे.आता ते विरुद्ध साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लढत असल्याने इथला प्रचार स्फोटक होण्याची चिन्हं आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी होत्या पण 9 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एकेक विधानं करायला सुरुवात केली होती. तुरुंगात आपला सलग 23 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला होता. आपल्याला जाणुनबुजून या दहशतवादी कटात गोवण्यात आलं, असाही दावा त्यांनी केला. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद नावाचा एक खोटा शब्द आणला आणि हे सिद्ध करण्यासाठीच आपल्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले, असंही त्यांचं म्हणणं होतं. VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक
    First published: