नवी दिल्ली, 11 मे: भाजप हा पक्ष कधीच फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचा नव्हात, ना कधी अडवाणींचा होता आणि तो कधीच फक्त अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा पक्ष असणार नाही, अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाबद्दल सांगितले. भाजप हा मोदी केंद्रीत पक्ष झाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. हा पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
भाजप हा पक्ष विचारधारेवर उभा राहिला आहे. त्यामुळे तो कधीच एका व्यक्ती पुरता मर्यादीत राहणार नाही. याआधी देखील ते अटल जी किंवा अडवाणी जी यांच्या पुरता मर्यादीत नव्हता आणि आता देखील तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या पुरता मर्यादित राहणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार हा अंदाज देखील त्यांनी फेटाळून लावला. यंदा भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळतील असा दावा त्यांनी केला.
वाचा:मोदींविरोधात 56 अपशब्दांचा पुरावा देताना गडकरींना हसू आवरेना, म्हणाले...
मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे मोदी
एकेकाळी इंदिरा इज इंडिया अॅण्ड इंडिया इज इंदिरा असे बोलले जात असे आता मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे मोदी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का या प्रश्नावर गडकरी म्हणाले, भाजप सारखा पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होऊ शकत नाही. आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही. पक्षातील महत्त्वाचे निर्णय संसदीय समितीकडून घेतले जातात. पक्षासाठी नेते आणि नेत्यांसाठी पक्ष हे एकमेकांना पुरक असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जर पक्ष मजबूत असेल तर आणि नेता कमकुवत असेल तर निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्याच बरोबर नेते मजबूत असेल आणि पक्ष कमकुवत असेल तरी यश मिळणार नाही. पण एक लोकप्रिय नेता सर्वात पुढे असतो.
मोदी सरकारने 5 वर्षात जितके काम केले आहे तितके काम 50 वर्षात झाले नाही. देशातील जनता एक योग्य पर्याय म्हणून पुन्हा भाजपलाच मत देईल, असे देखील गडकरी म्हणाले.
VIDEO: दुफळी माजवणारा क्रमांक एकचा नेता, लेखातून मोदींवर 'टाईम बॉम्ब'