या कारणामुळे तिहेरी तलाक विधेयकाला मिळणार मंजुरी

या कारणामुळे तिहेरी तलाक विधेयकाला मिळणार मंजुरी

Triple Talaq Bill राज्यसभेत पास होण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : तिहेरी तलाक विधेयक हे मोदी सरकारसाठी महत्त्वाचं आहे. या विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदी सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत होतं. पण, आता मोदी सरकारच्या या प्रयत्नांना यश येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण, लोकसभेत बहुमताच्या जोरादार विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेची मंजुरी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. पण, राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्यानं सरकारच्या या प्रयत्नांना यश येत नव्हतं. पण, आता मात्र सरकारचा हा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, मित्र पक्षाच्या मदतीनं भाजप आता राज्यसभेत देखील तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळवू शकतं. तर, विरोध करण्याऐवढं काँग्रेसचं संख्याबळ मात्र नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारचं महत्त्वकांक्षी असं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत संमत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.

नीरव मोदीनं केलेला PNB नाही तर हा आहे सर्वात मोठा घोटाळा

TDP, INLD खासदारांची साथ

नुकतंच भाजपनं TDPचे 4 आणि INLDच्या एक खासदाराला पक्षात सामील करून घेतलं. त्यामुळे भाजपचं राज्यसभेतील संख्याबळ हे 75 झालं आहे. शिवाय, गुजरातमधून देखील 2 जागा या भाजप राज्यसभेवर पाठवणार आहे. त्यामुळे संख्याबळात दोननं भर पडून ती 77 होणार आहे.

अमित शहा, स्मृति इराणींच्या जागा रिकामी

Loading...

लोकसभा निवडणुकीमध्ये अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी विजय मिळवला. त्यामुळे आता गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागा या रिक्त झाल्या आहेत.

राज्यसभेतील संख्याबळ

एआयएडीएमके – 13

जेडीयु – 6

एलजेपी – 1

शिवसेना – 3

अकाली दल – 3

सिक्कीम डेमोक्रेटीम फ्रंट – 1

बोडो पिपल्स फ्रंट – 1

आरपीआय – 1

एजीपी – 1

अपक्ष – 4

नामांकित – 3

एकूण - 115

बीजेडी – 5

वायएसआरसी – 2

टीआरएस – 6

नागा पीपल्स फ्रंट – 1

एकूण - 14

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...