S M L

राहुल गांधींचं जॅकेट भ्रष्टाचाराच्या पैशातून, भाजपची टीका

काँग्रेसने नेहमी नरेंद्र मोदी सरकारवर सूट-बूट की सरकार अशी टीका केलीये, पण आता खुद्द राहुल गांधी हे जवळपास 65 हजारांचं जॅकेट घालताय

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2018 05:58 PM IST

राहुल गांधींचं जॅकेट भ्रष्टाचाराच्या पैशातून, भाजपची टीका

31 जानेवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मेघालयाच्या दौऱ्यात घातलेल्या जॅकेटवर भाजपने आक्षेप घेतलाय. राहुल गांधींनी घातलेलं जॅकेट हे भ्रष्टाचाराच्या पैशातून घेतलंय अशी टीका भाजपने केलीये.

राहुल गांधी मंगळवारपासून दोन दिवसांच्या मेघालयाच्या दौऱ्यावर आहे. 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे. शिलांग इथं 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने 'सेलिब्रेशन आॅफ पीस' या कार्यक्रमाला राहुल गांधी हजर होते. यावेळी त्यांनी थंडीपासून बचावासाठी काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. या जॅकेटवरून भाजप मेघालयाने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय.

मेघालय भाजपने अधिकृत टि्वटर अकाऊंटवरून एक टि्वट केलंय. "तर राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराद्वारे मेघालय सरकारच्या तिजोरीची लूट केल्यानंतर ब्लॅक मनीतून सूट बूट की सरकार? आमच्या दुखावर गाणं गाण्याऐवजी, तुम्ही मेघालयच्या नाकारलेल्या सरकारचा रिपोर्ट कार्ड देताय. तुमची उदासिनता आमची थट्टा ठरत आहे."तसंच भाजपने राहुल गांधी यांनी घातलेलं जॅकेट आणि त्याची किंमतही जाहीर केली आहे. हे जॅकेट इंग्लंडचा फॅशन ब्रँड बरबरीने तयार केलंय. ब्लूमिंगडेल्स वेबसाईटच्या माहितीनुसार, या जॅकेटची किंमत 65,145 रुपये आहे.

भाजपच्या टि्वटनंतर टि्वटरवर राहुल गांधी यांच्या जॅकेटवरून चर्चा रंगलीये. काँग्रेसने नेहमी नरेंद्र मोदी सरकारवर सूट-बूट की सरकार अशी टीका केलीये, पण आता खुद्द राहुल गांधी हे जवळपास 65 हजारांचं जॅकेट घालताय. तर एका युजरने तर 65 हजारांचं जॅकेट आणि इम्पोर्ट टॅक्स जोडून जवळपास याची किंमत 90 हजारांच्या घरात जात असा शोध लावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 05:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close