राफेल करारावरून भाजपचा राहुल गांधींवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ‘हल्ला’

राफेल करारावरून भाजपचा राहुल गांधींवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ‘हल्ला’

राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत भाजपनं ट्विटरवरून राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 फेब्रुवारी : ‘द हिंदू’ या दैनिकाचा हवाला देत काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर राफेल करारावरून जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना आता भाजपनं देखील आपल्या ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे. यावेळी भाजपनं राहुल गांधी साफ खोटे बोलत असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी भाजपनं #lierRahul असा हॅशटॅग देखील चालवला आहे.

राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर

राहुल गांधींचा दावा 1 - सरकारने फ्रेंच मीडियाच्या रिपोर्टची मोडतोड करत  राहुल गांधी यांनी  ऑफसेट पार्टनर बनवण्याकरता दासाॅं कंपनीवर दबाव टाकला.

भाजपचं प्रत्युत्तर - याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि दासाॅं कंपनीच्या सीईओंनी ऑफसेट पार्टनरबाबत भारत सरकारनं कोणताही दबाव टाकला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधींचा दावा 2 – राहुल गांधी यांनी राफेल कराराबाबत अनेक अफवा पसरवल्या. त्याकरता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा देखील आधार घेतला.

भाजपचं प्रत्युत्तर – राफेल करारामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. पण, त्यानंतर देखील राहुल गांधी त्यावर अपप्रचार करत आहेत.

">

राहुल गांधींचा दावा 3 – राफेल कराराला संमती देण्याकरता 'एमओडी'नं वरिष्ठ अधिकाऱ्याला शिक्षा दिली.

भाजपचं प्रत्युत्तर – संबंधित अधिकाऱ्यांनं मीडियासमोर येत ही बाब खोटी असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल गांधी खोटं बोलत आहेत हे स्पष्ट होतं.

">

राहुल गांधींचा दावा 4 – फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटलं होतं. शिवाय, भारत सरकारनं  भारतीय कंपनीला 'ऑफसेट पार्टनर' बनवण्यासाठी सांगितले होते.

भाजपचे प्रत्युत्तर – फ्रान्स्वा ओलांद यांनी या मात्र राहुल गांधी यांचा दावा फेटाळून लावला. शिवाय, फ्रान्स सरकारनं देखील याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं.

">

राहुल गांधींचा दावा 5 – फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यान्युएल मॅक्रॉन व्यक्तिशा भेटले. त्यावेळी त्यांनी कराराच्या गोपनीयतेसंदर्भात कोणतीही अट नसल्याचं सांगितले.

भाजपचे प्रत्युत्तर – फ्रेंच सरकारनं याबाबत स्पष्टीकरण देत असा कोणताच करार झाला नसल्याचं स्पष्ट केलं.

">

राहुल गांधी यांचा दावा 6 – राहुल गांधी यांनी प्रत्येक वेळी राफेल विमानाची किंमत वेगवेगळी सांगितली. केव्हा 560 कोटी पर्यंत केव्हा 700 कोटी असल्याचा दावा केला.

भाजपचे प्रत्यत्तर – राहुल गांधी यांना खोटे बोलण्याकरता नोबेल पारितोषिक मिळायला हवं.

">

राहुल गांधी यांचा दावा 7 – मोदी सरकारमुळे सैनिकांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण झालं.

भाजपचे प्रत्त्युत्तर – न्यायालयानं मात्र याबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. शिवाय, करारातील प्रक्रियेमुळे समाधानी असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलं आहे.

">

राहुल गांधी यांचा दावा 8 – युपीएपेक्षा एनडीएनं कराराची किंमत वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

भाजपचे प्रत्युत्तर – एनडीए सरकारनं केलेला करार हा अत्याधुनिक विमानांचा आहे.

">

राहुल गांधी यांचा दावा 9 – राफेल करारामुळे एअरफोर्सला नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

भाजपचे प्रत्युत्तर – करारामुळे वायुदलाच्या ताकदीमध्ये वाढ होणार आहे. शिवाय, हवाईदल देखील यामुळे खूश आहे.

">

VIDEO: राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीत लागलं 500 जोडप्यांचं लग्न

First published: February 9, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading