मराठी बातम्या /बातम्या /देश /खून, हिंसा, खंडणीचे 16 गुन्हे दाखल असलेला कथित 'नेता' झाला भाजप युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष; नवा वाद सुरू

खून, हिंसा, खंडणीचे 16 गुन्हे दाखल असलेला कथित 'नेता' झाला भाजप युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष; नवा वाद सुरू

चर्चा तर होणारच! राजकारणातली गुंडगिरी किंवा गुंडांचं पुनर्वसन राजकारणात होणं हे काही नवं नाही. पण खून, मारामाऱ्या, खंडणीखोरी असे तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला BJP सारखा पक्ष पद देतो तेव्हा...

चर्चा तर होणारच! राजकारणातली गुंडगिरी किंवा गुंडांचं पुनर्वसन राजकारणात होणं हे काही नवं नाही. पण खून, मारामाऱ्या, खंडणीखोरी असे तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला BJP सारखा पक्ष पद देतो तेव्हा...

चर्चा तर होणारच! राजकारणातली गुंडगिरी किंवा गुंडांचं पुनर्वसन राजकारणात होणं हे काही नवं नाही. पण खून, मारामाऱ्या, खंडणीखोरी असे तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला BJP सारखा पक्ष पद देतो तेव्हा...

    लखनौ, 3 ऑगस्ट: राजकारणातली गुंडगिरी किंवा गुंडांचं पुनर्वसन राजकारणात होणं हे काही नवं नाही. पण खून, मारामाऱ्या, खंडणीखोरी असे तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षासारखा Party with difference म्हणवणारा राजकीय पक्ष महत्त्वाचं पद देतो, तेव्हा चर्चा तर होणारच. विविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh BJP) सध्या भाजपच्या युवामोर्चा अध्यक्षाच्या (BJP Yuva Morcha State Bearer) निवडीवरून राजकीय नाट्य रंगलं आहे. पक्षातील सदस्यही यामुळे नाराज असून, पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत माहिती नसल्याबाबतही कुजबुज सुरू झाली आहे.

    विरोधी पक्षांनीही याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    लालूपुत्राला म्हणे दिसतं भूत; तेजप्रताप घेतात महादेवाचं नाव

    उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक नियुक्त्या केल्या जात आहेत. नुकतीच इथं भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाची (BJP Yuva Morcha) निवड करण्यात आली. या पदावर भाजपनं अरविंद राज (Arvind Raj) उर्फ छोटू त्रिपाठी (Chotu Tripathi) यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाचा दुसरीकडे त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.

    ठाकरे सरकार Vs राज्यपाल वादाचा नवा अंक, थेट राजभवनावर धडकला निरोप

    छोटू त्रिपाठी यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी (History Sheeter) असून, त्यांच्यावर कानपूरमधील एका पोलिस ठाण्यात हत्या, खंडणी, मारामारी असे विविध 16 गुन्हे दाखल आहेत. विरोधी पक्षांनी या तक्रारी दाखल केल्या असून, त्यापैकी 16 खटल्यांमधून निर्दोष सुटल्याचा दावा छोटू त्रिपाठी यांनी केला आहे. केवळ एकच खटला उच्च न्यायालयात सुरू असल्याचं सांगत त्यांनी आपल्याविरुद्ध विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचं म्हटलं आहे.

    आपल्याविरुद्धच्या या सगळ्या तक्रारी समाजवादी पक्ष (SP) आणि बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सरकारच्या काळात नोंदवण्यात आले होते. बहुजन समाज पक्षाच्या स्थानिक उमेदवाराचा पराभव झाल्यानं त्यानं या जुन्या खटल्यांचं प्रकरण उकरून काढल्याचं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.

    अरविंद राज उर्फ छोटू त्रिपाठी यांची काकादेव पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांची यादी बाहेर आली असून त्यांच्यावर हत्या (Murder) , हत्येचा प्रयत्न असे 16 गुन्हे दाखल आहेत. 2005 मध्ये चकेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थी नेता सनी गिल याच्या हत्येचाही आरोप छोटू त्रिपाठी यांच्यावर आहे. या प्रकरणी सीतापूर सत्र न्यायालयानं त्यांना सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. या प्रकरणी छोटू त्रिपाठी बराच काळ तुरुंगात होते. नंतर उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली.

    भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

    छोटू त्रिपाठी यांचे संपूर्ण कुटुंब पूर्वीपासूनच भाजपशी जोडलेलं आहे. तीन वेळा त्याच्या कुटुंबातील सदस्य नगरसेवक राहिले आहेत. एकदा त्यांची आई आणि दोन वेळा त्यांचा भाऊ नगरसेवक राहिला आहे. छोटू त्रिपाठी विद्यार्थी परिषदेचं काम करत असून, कानपूरमधील विद्यार्थी चळवळीत ते सक्रीय होते. आता त्यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.

    First published:

    Tags: BJP, Politics, Uttar pradesh